बीकेसीवर ‘दसरा मेळावा’ आणि शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’; भाजपची ठाकरेंवर बोचरी टीका

बीकेसीवर ‘दसरा मेळावा’ आणि शिवाजी पार्कवर ‘हसरा मेळावा’; भाजपची ठाकरेंवर बोचरी टीका

शिवसेनेत उभी फूड पडल्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षावरचं दावा केला, यानंतर शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्यावरही शिंदे गटाने दावा केला होता,. तसेच हा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच घेण्यासाठी शिंदे गटाने पालिकेकडे परवानगी मागितली होती, मात्र पालिकेने परवानगी नाकारताच शिंदे गटासह शिवसेनेने हायकोर्टात धाव घेतली, अखेर कोर्टाने शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. तर शिंदे गटाला याआधी वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावर मेळावा घेण्यास परवानगी मिळाली आहे. असे असे असतानाही दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. यात शिंदे गटाच्या बाजूने भाजपही मैदानात उतरला आहे. भाजपकडून शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. यंदा दसऱ्याला बीकेसीवर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवर हसरा मेळावा आयोजित होईल अशा शब्दात भाजपने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या आशयाचे ट्विट केले आहे. दरम्यान शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास कोर्टाने उद्धव ठाकरेंना परवानगी दिल्यानंतरही यावरून सुरु असलेला राजकी वादंग अद्याप थांबवण्याचे नाव घेत नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज करत परवानगी मागितली होती. यावेळी शिवसेनेवर दावा करणाऱ्या शिंदे गटानेही शिवाजी पार्क मैदानातच दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज दाखल केला. मात्र पालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत दोघांनाही परवानगी नाकारली. यावेळी शिवसेनेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली. अखेरीस या प्रकरणावरील काल झालेल्या सुनावणीत मुंबईत हायकोर्टाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे.


वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो; शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावर मनसेचा हल्लाबोल


First Published on: September 24, 2022 2:53 PM
Exit mobile version