सोमय्यांच्या किरकोळ जखमेतून रक्तस्त्राव नाही, वैद्यकीय अहवालात खळबळजनक खुलासा

सोमय्यांच्या किरकोळ जखमेतून रक्तस्त्राव नाही, वैद्यकीय अहवालात खळबळजनक खुलासा

सोमय्यांच्या किरकोळ जखमेतून रक्तस्त्राव नाही, वैद्यकीय अहवालात खळबळजनक खुलासा

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी खार पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात सोमय्यांना हनुवटीला जखम झाली असू रक्तस्त्राव झाला असल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. परंतु सोमय्यांना ०.१ सेमीची जखम झाली असून त्यातून रक्तस्त्राव झाला नाही असा वैद्यकीय अहवाल भाभा रुग्णालयाने दिला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सोमय्यांच्या हनुवटीला जे रक्त होते ते कंस आलं? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भाभा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी समोय्यांना जखम झाली नसल्याचे सांगितल्यामुळे सोमय्या- शिवसेना संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. हल्ल्यात गाडीची काच फुटून हनुवटीला जखम झाली असल्याचे सोमय्यांनी सांगितले होते. तसेच त्यांना जखम झाली असून त्यातून रक्तस्त्राव होत असल्याच्या व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान जखमेतून होणारा रक्तस्त्राव कृत्रिम असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. यामध्ये आता भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय रिपोर्टमुळे मोठा खुलासा झाला आहे.

डॉक्टरांनी रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

किरीट सोमय्या यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार किरीट सोमय्या यांना ०.१ सेमीची जखम झाली आहे. जखम किरकोळ असून त्यातून रक्तस्त्राव झाला नाही.

ओठाखाली टोमॅटो सॉस लावून … – राऊत

एक वेडा माणूस ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत असेल तर त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही. अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे.

सोमय्यांवर खार पोलीस ठाण्याबाहेर हल्ला

माजी खासदार किरीट सोमय्या शनिवारी संध्याकाळी खार पोलीस ठाण्यात राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी खार पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला. दगडफेक आणि चप्पलफेक करण्यात आली. यावेळी सोमय्यांच्या गाडीची काच फुटून त्यांच्या हनुवटीला जखम झाली. सोमय्या गाडीत बसले असताना त्यांच्या जखमेतून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसत होते. दरम्यान सोमय्यांना झालेल्या जखमेवरुन राजकीय वर्तुळात वाद सुरु झाला होता. सोमय्यांनी घटनेची माहिती केंद्रीय गृहसचिव आणि गृहराज्यमंत्र्यांना भेट घेऊन दिली होती. तसेच शिवसैनिकांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप देखील सोमय्यांनी केला आहे.


हेही वाचा : ‘मी टोमॅटो सॉस लावून फिरतो’ तर महाडेश्वरांना अटक कशी?, किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर पलटवार

First Published on: April 27, 2022 11:43 AM
Exit mobile version