घरताज्या घडामोडी'मी टोमॅटो सॉस लावून फिरतो' तर महाडेश्वरांना अटक कशी?, किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर...

‘मी टोमॅटो सॉस लावून फिरतो’ तर महाडेश्वरांना अटक कशी?, किरीट सोमय्यांचा शिवसेनेवर पलटवार

Subscribe

‘मी टोमॅटो सॉस लावून फिरतो’ तर महाडेश्वरांना अटक कशी? असा सवाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. खार पोलीस ठाण्यासमोर किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सोमय्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. त्यातून रक्तस्त्राव झाला होता. पंरतु सोमय्या टोमॅटो सॉस लावून फिरत होते असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर सोमय्यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफिया सेना दडपणाखाली आली आहे असे वक्तव्य सोमय्या यांनी केले आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना हनुवटीला झालेल्या जखमेबद्दल विचारण्यात आले. तसेच राऊतांच्या आरोपांवर सोमय्या म्हणाले की, टोमॅटो केचअपच्या आधारावर मुखयमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे माजी महापौर महाडेश्वरांची अटक केली. काय चाललंय, बनावटीच्या केचअपच्या आधारावर अटक करतात, किती नौटंकी आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेंची माफिया सेना किती दडपणाखाली आली आहे. पहिला कोणाचा घोटाळा बाहेर काढावा संजय राऊतचा की रश्मी ठाकरेंचा ही स्पर्धा सुरु असे सोमय्या म्हणाले आहेत.

- Advertisement -

संजय पांडेंवर कारवाई करावी

सगळे पुरावे आम्ही देणार, संजय पांडे नवनीत राणांचा आधीचा चहा पाजणारा व्हिडीओ जारी करतात हे राज्यपालांना सांगतात. पोलीस आयुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीचे पोलीस आयुक्त झालेले आहेत. खार पोलीस ठाण्यात १ तास ५० मिनिटे माजी एफआयआर घेतली. रेकॉर्डिंग केलं ते रेकॉर्डिंग ताब्यात घ्या. फसवा फसवी केली तर पुरावे अन्य कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग आहेत. हे संजय पांडेंनी लक्षात ठेवावं. संजय पांडेंविरोधात फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी असून बनवा बनवी बंद करावी असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

ठाकरे CISF ची FIR घेण्यास घाबरत आहेत

खार पोलीस ठाण्यात जो हल्ला झाला. कमांडोवर बाटल्या फेकण्यात आल्या त्यांची एफआयआर का घेतली जात नाही आहेत. सीआयएसएफची एफआयआर घेण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का घाबरत आहेत. कारण त्यामध्ये समजेल सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता. म्हणून राज्यपाल हे घटनेच्या दृष्टिने राज्याचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांच्याकडे तक्रार करणार असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

- Advertisement -

पोलिसांना आयुक्त संजय पांडे यांचा फोन आला..

एफआयआर झाली १ तास ५० मिनिटे रेकॉर्डिंग झाली आहे. संजय पांडेंचं हत्यार आता त्यांच्याच हातात आलं आहे. तुम्ही चहा पाजण्याचा व्हिडीओ टीव्हीवर दाखवू शकतात. किरीट सोमय्या बसले होते त्यांचे एफआयआर नोंदवण्यात आले. प्रिंट काढण्यात आली, नंबर टाकण्याचे काम सुरु असताना पोलिसांना आयुक्त संजय पांडे यांचा फोन आला, पोलीस घाबरले. उद्धव ठाकरेंनी सांगितले किरीट सोमय्यांची तुम्ही एफआयआर घेता की मी फेक एफआयआर केली. यामुळे ते कागद फाडण्याचे धाडस झाले. राज्यपालांनी रिपोर्ट मागवला पाहिजे आणि त्यांनी केंद्रात पाठवला पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत.


हेही वाचा : छगन भुजबळांचा ४ वर्षानंतर परदेश प्रवासाचा मार्ग मोकळा, पासपोर्ट परत देण्याचे कोर्टाकडून EDला आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -