कोरोना काळातील निविदांमधील भ्रष्टाचार प्रकरणाची आता ईडी चौकशी, सोमय्यांकडून पुन्हा ठाकरे गटाला टार्गेट

कोरोना काळातील निविदांमधील भ्रष्टाचार प्रकरणाची आता ईडी चौकशी, सोमय्यांकडून पुन्हा ठाकरे गटाला टार्गेट

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा मुंबईतील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा आर्थिक भ्रष्टाचार केल्याच्या आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याविरोधात 2022 मध्ये तक्रार दाखल केल्याची कागद पत्र जाहीर केली आहेत. तसेच या प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचे म्हणत सोमय्यांनी पुन्हा ठाकरे गट आणि मुंबई महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई महापालिकेने गेल्या 140 दिवसात या प्रकरणात कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे पोलीस EOW आणि इतर एजन्सींकडून आता पालिकेला याबाबत विचारणा केली जात आहे, अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात आता ईडीने एन्ट्री घेतली असून तपास वेगाने सुरु झाला आहे.

यावर बोलताना सोमय्या म्हणाले की,  कोविड सेंटरची कमाई ही उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांसाठी आणि महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी कमाईचे साधन झालं होत. जम्बो कोविड सेंटरमध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याप्रकरणी आझाद मैदान कोर्टात याचिका दाखल केली होती, कोर्टाने आदेश दिला म्हणून मुंबई पोलिसांनी ऑगस्ट 2022 मध्ये FIR नोंदवला. पण त्यानंतर मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल चहल आणि त्यांच्या सहकार्यांनी कोणतेही पेपर ईडी किंवा आयकराला दिले नाही. इकोनॉमिक ऑफेंस पोलिसांना दिले नाही, कंपनी मंत्रालयाला दिले नाही, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

चार दिवसांपूर्वी पालिकेने काही पेपर त्यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांच्या कंपनीने आणखी एक भागीदार जो केईएमच्या समोर चहावाला आहे, दुसरा एक त्यापाठीमागच्या झोपडपट्टीत राहतो, हे कोणाचा बेईनामी पार्टनर आहेत? 100 कोटींचा Contract मिळाला यातील 38 कोटीच्या पेमेंटचे पुरावे दिले, हा पैसा उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्याच्या बँक अकाऊंटमध्ये गेला आहे, चौकशी होणारचं म्हणत त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांना टार्गेट केले आहे.

दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलूंड येथील कोव्हिड केंद्रांवर सुजीत पाटकर यांच्या कंपनीच्या माध्यमातून डॉक्टर्स पुरवले जायचे. या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा सोमय्यांचा आरोप आहे.


कळव्यात एका इमारतीच्या मीटर बॉक्सला आग; ६८ मीटर बॉक्स जळून खाक

First Published on: January 13, 2023 10:14 AM
Exit mobile version