पटोलेंच्या सुपीक डोक्यातील नापीक कल्पनांना जनता भीक घालत नाही, मुनगंटीवारांचा टोला

पटोलेंच्या सुपीक डोक्यातील नापीक कल्पनांना जनता भीक घालत नाही, मुनगंटीवारांचा टोला

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. या आरोपांना आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “ही सुपीक डोक्यातून आलेली नापीक कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्या सुपीक डोक्यातील नापीक कल्पनेला जनता भीक घालत नाही” असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. आज सुधीर मुनगंटीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधान भवनाचे सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उद्या उद्याच्या विश्वासदर्शक प्रस्तावाच्या संदर्भामध्ये सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात आणि विशेष करुन जे आमदार आजारी आहेत त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थेसंदर्भात चर्चा केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच बहुमत चाचणीच्या आसन व्यवस्थेसह निर्भयी वातावरणात बहुमत चाचणी व्हावी, यााबाबत चर्चा केल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

स्वत:चे आमदार टिकवता आले नाहीत, तेव्हा राज्यपालांवर टीका करायची

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी मविआमधील फुटीच्या संदर्भात भाष्य केल आहे. मग अल्पमतात सरकार आहे तरी हे लोकशाहीवर जबरदस्ती का करत आहेत? जेव्हा त्यांचे आमदार त्यांना टिकवता आले नाहीत, तर राज्यपालांवर टीका करायची, भाजपवर टीका करायची…तुम्ही केजीवनचे विद्यार्थी आहेत का? तुम्ही म्हणजे दगडाचे… की तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही…. आणि बाकीचे 41 आमदार म्हणजे हाड, रक्त वंसाचे आहेत की त्यांच्यावर परिणाम होतो. ही गंम्मतबाजी थांबली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या सुपीक डोक्यातील नापीक कल्पनेला जनता भीक घालत नसल्याचे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

“वृत्तपत्र आणि चॅनेलच्या माध्यमातून जे लोक धमक्या देत आहेत, गुंडगिरीची भाषा करत आहेत, अशांतता निर्माण करण्यासंदर्भात भाष्य करत आहेत. या गोष्टींकडे गंभीरतेने लक्ष द्यावे आणि प्रत्येकाला सद्सकविवेक बुद्धीनेमुक्त वातावरणात लोकशाहीचा अधिकार बजावता यावा कोणत्याही दानव प्रवृत्तीने या लोकशाहीच्या मंदिरात हमला करण्याचा प्रयत्न करु नये ही गंभीरता विधानमंडळाच्या, आणि विधान भवनाच्या सचिवांच्या लक्षात आणून दिली” असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

भाजपला एक गोष्ट लक्षात आणून द्यायचं आहे की, हा महाराष्ट्रात इथे आतंकी, दानवी, गुंड प्रवृत्ती…. गुंडागर्दी करण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला, तरी महाराष्ट्राची जनता संविधानानी अधिकार दिले आहे त्याप्रमाणे पोलिसांकडून कारवाई केली जाईल. त्यामुळे उद्याची बहुमत चाचणी ही निर्भय पद्दथीनं व्हावी” याबाबत उपाध्यक्ष आणि प्रधान सचिवांशी चर्चा झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले.


हारी बाजी को जितना जीसे आता है वो देवेंद्र ही… भाजप नेत्याचे ट्विट चर्चेत


First Published on: June 29, 2022 3:31 PM
Exit mobile version