भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; संघटनमंत्री पुराणिक कार्यमुक्त

भाजपची अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; संघटनमंत्री पुराणिक कार्यमुक्त

भाजपच्या प्रदेश संघटनमंत्रिपदावरुन विजय पुराणिक यांना कार्यमुक्त

भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे आता चव्हाट्यावर येऊ लागले आहे. पक्षाच्या संघटनात्मक रचनेमध्ये अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या भाजपच्या प्रदेश संघटनमंत्रिपदावरुन विजय पुराणिक यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. अंतर्गत वादातून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोले जात आहे. तर संघटनमंत्रिपदाचा अतिरिक्त कारभार सध्या श्रीकांत भारतीय यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, पक्षात नेमक्या कोणत्या कारणावरुन धुसफूस सुरु आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

यामुळे आली असावी कटुता

मागील काही दिवसांपासून भाजपचे प्रदेश नेतृत्व आणि विजय पुराणिक यांच्यामध्ये कटुता निर्माण झाली होती. पक्षातील संघटनात्मक नियुक्त्या आणि पक्षातर्फे राबविण्यात येणारे कार्यक्रम यावरुन धुसफूस सुरु असल्याचे समोर आले असून याच कारणामुळे पुराणिक यांना पायउतार व्हावे लागल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात येणार

एकीकडे पक्षातील कटुता दिसून येत आहे तर दुसरीकडे पक्षातील एका नेत्याने ‘पुराणिक यांना पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे बोले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे’.

भाजपमध्ये संघटनमंत्रिपदाला मोठे महत्त्व

भाजपमध्ये संघटनमंत्री या पदाला मोठे महत्त्व आहे. कारण संघटनमंत्री हे पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वाच्या भूमिका बजावात. तसेच परंपरेनुसार या पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेऊन त्याची नियुक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केली जाते. ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यावेळी रवींद्र भुसारी यांच्याकडे संघटनमंत्रिपद होते. मात्र, त्यांना अचानक पदावरुन हटवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी स्वत: पदमुक्त होण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपाचे नेतृत्व असताना पुराणिक यांच्याकडे संघटनमंत्रिपदाचा पदभार होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याचे आता समोर आले आहे.


हेही वाचा – ३१ मार्चपूर्वी पॅन आधारशी लिंक करा अन्यथा पॅन Inactive होईलच आणि…


 

First Published on: March 7, 2021 1:53 PM
Exit mobile version