घरट्रेंडिंग३१ मार्चपूर्वी पॅन आधारशी लिंक करा अन्यथा पॅन Inactive होईलच आणि...

३१ मार्चपूर्वी पॅन आधारशी लिंक करा अन्यथा पॅन Inactive होईलच आणि…

Subscribe

पॅन आधारशी लिंक करा अन्यथा महागात पडेल.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन अशी महत्त्वाची ओळखपत्र आहेत, जी आता कोणत्याही ठिकाणी गरजेची ठरतात. तसेच आपली ओळख करुन देण्यासाठी देखील आता या ओळखपत्रांचाच वापर केला जातो. मग इनकम टॅक्स रिटर्न, लोन घेणे, बँक खाते उघडणे असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची कामे करताना असो. सुरुवातीच्या काळात सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा अवधी ३० जून २०२० दिला होता. त्यानंतर तो वाढवून आता ३१ मार्च २०२१ केला आहे. त्यामुळे आता दिलेल्या तारखेपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड Inactive होऊ शकत. तसेच तुम्हाला दंडही भरावा लागले.

किती भरावा लागेल दंड?

येत्या ३१ मार्चपर्यंत जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड १ एप्रिल २०२१ पासून Inactive होणार. तसेच डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, पॅन कार्ड धारकांना विना पॅन कार्डधारक मानले जाईल. त्याशिवाय आयकर कायद्यानुसार १० हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.

- Advertisement -

अस करा पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी www.incometaxindiaefiling.gov.in या साईटवर जा. त्याठिकाणी तुमह्ला Link Aadhaar चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, नाव, कॅप्चा कोड भरावा लागेल. त्यानंतर Link Aadhar वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.

SMS द्वारेही करता येणार लिंक

आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवावा लागेल. यासाठी UIDAIPAN (१२ अंकी आधार नंबर) स्पेस (१० अंकी पॅन नंबर), असेही करता येईल.

- Advertisement -

हेही वाचा – Live Update: मुंबईत आज लसीकरण राहणार बंद


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -