साचलेल्या पाण्यात भाजप प्रवक्त्यांचे बुट निखळले

साचलेल्या पाण्यात भाजप प्रवक्त्यांचे बुट निखळले

संबित पात्रा आणि केशव उपाध्ये पाण्यातुन वाट काढताना

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे मुंबईकरांचे बेहाल झाले आहेत. अनेक सखल भागात पाणी साचल्याने मुंबईच्या रस्त्यांवरुन लोकांना वाट काढतानासुध्दा मुश्कील झाले आहे. मुंबईकरांना सहन कराव्या लागणाऱ्या या त्रासापासून भाजपचे प्रवक्तेदेखील वाचू शकले नाहीत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि संबित पात्रा हे देखील दादरच्या रस्यावरुन वाट काढताना चांगलेच पाण्यात अडकले. पाण्यातुन वाट काढताना अडचण होत होती म्हणुन भाजपचे नेते संबित पात्रा यांना पायातले बुट हातात घेवुन वाट काढावी लागली. यासंदर्भातला एक फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असुन संबित पात्रा यांच्यासोबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये हे देखील दिसत आहे.

पावसामुळे नियोजित पत्रकार परीषद रद्द.

दरम्यान भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा याची आज नियोजित पत्रकार परीषद होती मात्र पावसामुळे ही पत्रकार परीषद गद्द करण्यात आली. तीन दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे याचा परीणाम हा वाहतुकीवर झाला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रेल्वे वाहतुकही विस्कळीत..

जोरदार सुरु असलेल्या पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीवरसुध्दा बसला असुन भाईंदरपासुन वसई-विरार पर्यंतची पश्चिम रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प करण्यात आली आहे. तर सायन आणि माटुंगा दरम्यान रेलवे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मध्य रेल्वेवरसुध्दा पाणी साचल्याने ही वाहतुकसुध्दा धीम्या गतीने सुरु आहे.

First Published on: July 10, 2018 4:57 PM
Exit mobile version