दुसऱ्यांच्या संसारात काय चाललंय, हे बघायला त्यांचा बाप मोकळा आहे – चंद्रकांत पाटील

दुसऱ्यांच्या संसारात काय चाललंय, हे बघायला त्यांचा बाप मोकळा आहे – चंद्रकांत पाटील

“माझ्या बापाने माझ्या संसारात लक्ष द्यायला शिकवले दुसऱ्यांच्या संसारात काय चाललं हे बघायला त्यांचा बाप मोकळा आहे”, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केले. महा विकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला होणाऱ्या उशिराबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान आज भाजपची संघटनात्मक बैठक मुंबई येथे पार पडली त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

मुंबई पालिका निवडणूक जिकने हे उद्दिष्ट

दरम्यान आजच्या बैठकीत मुंबईचा आढावा घेण्यात आला असून, २०२२ ची मुंबई महापालिका निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढवणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगत मुंबईच्या महापौर भाजपचा व्हावा, यासाठी चर्चा केल्याचे देखील ते म्हणालेत. मुंबईतील २२७ वॉर्ड, ३६ विधानसभा अध्यक्ष आणि ६ लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतल्याचे सांगत ३० तारखेपर्यंत आम्ही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच ३० तारखेला मुंबईच्या अध्यक्षाची घोषणा होणार असल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले.

जानेवारीमध्ये निवडला जाणार प्रदेशाध्यक्ष

विशेष बाब म्हणजे १ ते ५ जानेवारीपर्यंत प्रदेशअध्यक्ष पदाची नेमणूक होणार असून केंद्रातून एक मुख्य नेता येऊन प्रदेशाध्यक्षाची घोषणा करेल, असे देखील पाटील यांनी सांगितले. तसेच दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणूक होतात पण यावेळी विधानसबा निवडणुकीमुळे आणि सत्ता पेचामुळे या निवडणुका लांबल्याचे त्यांनी मान्य केले. दरम्यान एकनाथ खडसे यांच्या नाराजी बद्दल त्यांना विचारले असता नाथाभाऊनी १९७८ पासून भाजपसाठी खालच्या स्तरावरून काम करत भाजपला वर आणल्याचे त्यांनी सांगितले. काल त्यांच्यासोबत माझी एक तास चर्चा झाली. त्यांचा जो आक्षेप आहे की त्यांच्या मुलीला पाडण्याचं काम भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केलं. त्यामुळे या संदर्भाचे आम्ही पुरावे मागवले असून, ज्यांनी असे काही केले असेल त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई नक्की केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांना क्लिन नव्या सरकारने दिली

अजित पवार यांना सिंचन प्रकरणी भाजपने क्लीन चिट दिललेली नाही. ज्या केस मागे घेतल्या गेल्या त्यात अजित पवार यांचा काही हस्तक्षेप नव्हता. अजित पवार ज्यामध्ये दोषी आहेत अश्या कोणत्याच फाईल भाजप सरकारने क्लीयर केलेल्या नाहीत. जर त्या क्लीयर झाल्या असतील तर त्या आताच्या सरकारने केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

First Published on: December 8, 2019 7:23 PM
Exit mobile version