अमरावतीमधील श्रीक्षेत्र झुंज येथे बुडाली नौका; तीन वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, ११ जण बेपत्ता

अमरावतीमधील श्रीक्षेत्र झुंज येथे बुडाली नौका; तीन वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, ११ जण बेपत्ता

अमरावतीमधील श्रीक्षेत्र झुंज येथे बुडाली नौका; तीन वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, ११ जण बेपत्ता

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे नौका बुडाल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेमध्ये ११ जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह सापडले असून सध्या इतरांचे शोध काम सुरू आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एक तीन वर्षांच्या चिमुकला असल्याची माहिती मिळत आहे. सध्या घटनास्ठळी स्थानिक प्रशासनसह पोलीस प्रशासन आणि पोहणारे लोकं उपस्थितीत आहेत.

या घटनेबाबत एका मराठी वृत्तवाहिनीला माहिती देताना स्थानिक आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, ‘स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन आणि पोहणारे लोकं इथे उपस्थितीत आहेत. ११ पैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. यांच्यामध्ये तीन वर्षांचा चिमुकला आहे. तर ३२ वर्षांची एक महिला आहे आणि ४८ वर्षांचा पुरुष आहे, असे तीन जणांचा मृतदेह आढळला आहे. सध्या इतर लोकांची शोध मोहीम सुरू आहे. रेस्क्यू टीमसह इतर लोकं शोधाशोध करत आहेत. आमच्या तालुक्यातील सर्वात मोठी घटना आहे.’

पुढे देवेंद्र भुयार म्हणाले की, ‘नागपूर आणि अमरावती या दोन जिल्ह्याच्या संगमवरून वर्धा नदी गेलेली आहे. झुंज नावाचं मोठं पर्यटन आणि प्राचीन क्षेत्र आहे. हजारो पर्यटक येथे दर्शनासाठी येतात. यादरम्यान लोकं नदीत पोहण्यास आणि बोटिंग करण्यासाठी हट्टास करतात. आज क्षमतेपेक्षा नावेमध्ये लोकं बसल्यामुळे ही नाव पलटी झालाचा आमचा संशय आहे. आमची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. महसूल, पोलीस यंत्रणा बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. दरम्यान एका कार्यक्रमनिमित्ताने ही सगळी मंडळी आली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर वाघमारे, मटरे, खंडाळे परिवार हे एकाचे कुटुंबातील नातेवाईक आहेत ते पुन्हा परतत होते. त्याचवेळेस नौका पलटी झाली.’


हेही वाचा – बीड: आजारी बाळाला घेऊन जाणाऱ्या जीपचा अपघात; दोन जण जागीच ठार


First Published on: September 14, 2021 2:11 PM
Exit mobile version