महाराष्ट्रातील रॅपिडोचा व्यवसाय पूर्णपणे बंद होणार, मुंबई हायकोर्टाची माहिती

महाराष्ट्रातील रॅपिडोचा व्यवसाय पूर्णपणे बंद होणार, मुंबई हायकोर्टाची माहिती

महाराष्ट्रातील रॅपिडोचा व्यवसाय पूर्णपणे बंद होणार असल्याची माहिती मुंबई हायकोर्टाने दिली आहे. रॅपिडो बाईक टॅक्सी कंपनीने येत्या २० जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील सेवा पूर्णपणे बंद करणार असून मोबाईल अॅप्लिकेशनवरील सेवा आज दुपारी १ वाजल्यापासून बंद करणार असल्याचं मुंबई हायकोर्टाने मान्य केलं आहे.

जर कंपनीने आपली सेवा तात्काळ निलंबित केली नाही तर न्यायालय कंपनीला कोणताही परवाना मिळण्यापासून कायमस्वरुपी मनाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देईल, अशी सक्त ताकीद न्यायमूर्ती जीएस पटेल आणि एसजी डिगे यांच्या खंडपीठाने रॅपिडो कंपनीला दिली होती. मात्र, आता कंपनीकडून सेवा बंद करण्याची हमी देण्यात आली आहे.

कंपनी त्यांच्या सर्व सेवा २० जानेवारीपर्यंत निलंबित करेल आणि त्यांच्या अॅपवर कोणत्याही वाहनाच्या बुकिंगसाठीच्या सेवा देखील महाराष्ट्रात बंद राहील याची खात्री करेल, असं वकिलांनी कोर्टाला सांगितलं. बाईक टॅक्सीच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणतीही परवाना व्यवस्था अस्तित्वात नाही, अशी निरीक्षणं देखील कोर्टानं नोंदवली आहेत.

राज्य सरकारने २९ डिसेंबर २०२२ च्या आदेशात बाइक टॅक्सीच्या परवान्याबाबत राज्याचे कोणतेही धोरण आणि बाइक टॅक्सीसाठी भाडे संरचना धोरण नसल्याचे नमूद केले होते. खंडपीठाने २ जानेवारी रोजी राज्याला दुचाकी वाहतुकीचे फायदे विचारात घेण्यास सांगितले होते. दुचाकी किंवा बाइक टॅक्सी एग्रीगेटच्या संदर्भात अंतिम निर्णय कधी घ्यायचा याविषयी राज्याचे सूचना घेण्यासाठी हे प्रकरण १० जानेवारीपर्यंत तहकूब केले होते. बाईक टॅक्सी एग्रीगेटर्सना राज्यात चालवण्याची परवानगी नाही, कारण त्याचे नियमन करणारे कोणतेही धोरण किंवा मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात नाहीत, असे सरकारतर्फे वकील जनरल डॉ. बिरेंद्र सराफ यांनी १० जानेवारी रोजी आपल्या युक्तिवादात म्हटलं होतं.

राज्याकडून धोरण तयार होत नाही तोपर्यंत बाइक टॅक्सी चालवता येणार नाही, अशी भूमिका स्वीकारण्यास कोर्टाने नकार दिला. सराफ यांच्याबाबत जोपर्यंत निर्णय प्रलिंबत आहे, तोपर्यंत रॅपिडोला त्यांच्या बाइक टॅक्सी चालवण्यापासून थांबवायला हवे असा युक्तिवाद केला.


हेही वाचा : Hockey World Cup 2023: भारत वि. स्पेन यांच्यात रंगणार पहिला सामना


 

First Published on: January 13, 2023 4:19 PM
Exit mobile version