अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन

अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघ आक्रमक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी ब्राह्मण महासंघाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर ब्राह्मण महासंघाने आंदोलन केलं. ब्राह्मण महासंघाच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनही विरोध करण्यात आल्याचं पहायला मिळालं. यावेळी महासंघाचे प्रमुख अनिल दवे यांनी आपल्या सहकार्यांसह मिटकरींविरोधात घोषणाबाजी केली.

हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीनं वापरला

अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असं आम्ही म्हणतच नाही. त्यांनी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नव्हतं. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीनं वापरला, यावर आमचा आक्षेप आहे, असं आनंद दवे म्हणाले.

पुढे दवे म्हणाले की, मी माझी बायको पुरोहिताला देत आहे, असं त्यांनी वक्तव्य वापरलं आहे. हे चुकीचं आहे. हेच विधान ते नमाजविरोधात बोलू शकतील का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मी कोणाबद्दलही अपशब्द  वापरलेला नाही

माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाहीये. मी कोणाबद्दलही अपशब्द  वापरलेला नाही. मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला,
असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आंदोलनाविरोधात दिलंय.

अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद सभेत भाषण करताना पुरोहित वर्गाची आणि ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लोकशाही पद्धतीने आंदोलन करावं

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी कोणत्याही पद्धतीचं निराशाजनक वक्तव्य केलेलं नाहीये. फक्त टीप्पणी केली आहे. तसेच धक्काबुक्की न करता लोकशाही पद्धतीने आंदोलन करावं. आनंद दवेंचं डोक फिरलं असून त्यांना आंदोलनाची चौकट कळत नाही. आम्हीही आंदोलन करतो. मात्र, चौकट राखून करावं, असं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील
म्हणाल्या.


हेही वाचा : माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस, खासदार सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट


 

First Published on: April 21, 2022 1:43 PM
Exit mobile version