घरताज्या घडामोडीमाझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस, खासदार सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस, खासदार सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडी आणि इनकम टॅक्सच्या रेडबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील टीका केली आहे. माझ्या भावाच्या घरी कधीच ईडीची रेड झाली नाही, पण, माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस

सुप्रिया सुळे सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही. कदाचित त्या लोकांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल. त्यांचा बेसच चुकीचा आहे, त्यामुळे तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु ज्या दिवशी मी केंद्र सरकारच्या विरोधात तीन भाषणं दिलं. त्यामुळे माझ्या नवऱ्याला इनकम टॅक्सची नोटीस आलीय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

राज ठाकरेंवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर इडीची रेड होते, मात्र सुप्रिया सुळेंच्या घरावर होत नाही. आपल्याच पक्षातील नेत्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवार हे मोदींना भेटत तर नसावेत ना, असा टोला राज ठाकरे यांनी भाषणामध्ये लगावला होता. यावेळी सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

त्यांचा बेसच चुकीचा आहे

मला कुणाची चूक नाही काढायची. माझा तो स्वभाव नाही. पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला सांगू इच्छिते की, माझ्या भावाच्या घरी कधीच रेड झालेली नाही. कदाचित त्या लोकांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली असेल. त्यांचा बेसच चुकीचा आहे, त्यामुळे तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा : मशिदींवरचे ७० टक्के अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याचा माहितीचा स्त्रोत काय?, संदीप देशपांडेंचा सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -