Bullock Cart Race : आढळराव पाटलांच आव्हान स्वीकारलं ! डॉ. अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीत मारली बाजी

Bullock Cart Race : आढळराव पाटलांच आव्हान स्वीकारलं ! डॉ. अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीत मारली बाजी

 Bullock Cart Race :  शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी बैलगाडा शर्यतीवरुन अमोल कोल्हे यांना खुले आव्हान देत निमगाव घाटात येण्याचे आमंत्रण दिले होते. आढळराव पाटलांचे आव्हान स्वीकारत डॉ. अमोल कोल्हेंनी पुण्यातील दावडी निमगात बैलगाडा शर्यतील  हजेरी लावून निमघाटात घोडीवर बसून बैलजोडीसमोर कमाल बाजी मारली. बैलगाडा शर्यतीवरील बंद हटवून बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणूकांच्या प्रचारात  बैलगाडा शर्यत सुरू होताच पहिल्या बारीत घोडीवर बसेन असा शब्द अमोल कोल्हेंनी दिला होता आणि त्यांनी तो शब्द पूर्ण करत घोडीवर बसून बैलजोडीसमोर बारी धरली. एका अभिनेता नंतर एक राजकीय व्यक्ती आणि आज बैलगाडा शर्यतीवेळी डॉ.अमोल कोल्हे यांचे वेगळे रुप पाहायला मिळाले.

यावेळी बोलताना, अमोल कोल्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. मी घोडी धरेन की नाही अशी ज्यांना शंका होती त्यांना उत्तर मिळाले आहे. दोन हात सोडून संपूर्ण घाट पार केला आहे. देवाच्या दारात पहिल्या बारीसमोर घोडी धरायचा शब्द दिला होता तो देवाच्या दारात पूर्ण केला आहे, असे उत्तर अमोल कोल्हेंनी यावेळी विरोधकांना दिले.

पहिल्यांदा देशातील संसदेतील एक खासदार घाटात एका घोडीवर बसला आहे आणि त्यामुळे बैलगाडा शर्यत राज्यात नाही तर देशभरात पोहोचून इथल्या पर्यटनाला चालना मिळावी असे मला वाटते, असे डॉ.अमोल कोल्हे यांनी म्हटले.

शिरुर मतदार संघाने जो विश्वास दाखवला,लोकसभा निवडणूकीत पायाला भिंगरी लावून प्रचार केला, त्यामुळे हे शक्य झाले त्यामुळे माझ्या मतदार संघाचे मनापासून आभार. कोणत्याही इनामाच्या घाटात घोडी धरण्यापेक्षा देवाच्या दारात घोडी धरणे मला योग्य वाटते म्हणून निमघाटात देवाच्या दारात मी घोडी थरली. बारी लावण्याचा माझा हा पहिला अनुभव होता.  परंतु मुक्या प्राण्याशी एक नाते असते तसे माझे माझ्या घोडीशी नाते आहे. तू माझी काळजी तुझी काळजी मी घेईन असे मी तिला सांगितले आणि  निमगावच्या घाटात धुराळा उडवून दिला, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.


हेही वाचा – नव्या वर्षात मध्य रेल्वेवर ३६ नवीन लोकल फेऱ्या, पंतप्रधानांच्या हस्ते होणार नव्या मार्गिकेचे उद्घाटन

First Published on: February 16, 2022 12:55 PM
Exit mobile version