जोडप्याने केली बस ड्रायव्हरला मारहाण, गुन्हा दाखल

जोडप्याने केली बस ड्रायव्हरला मारहाण, गुन्हा दाखल

(फोटो प्रातिनिधीक आहे)

बस थांब्यावर बस जवळ उभी केली नाही म्हणून एका जोडप्याने ड्रायव्हरलाच मारहाण केल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. बुधवारी रात्री MSRTC च्या बस चालकासोबत हा सगळा प्रकार घडला असून मारहाण करणाऱ्या जोडप्यावर भद्रकाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आधी देखील बस चालकांना मारहाण करण्याचे अनेक प्रकार या ठिकाणी घडले आहेत.

नेमकं काय झालं?

बुधवारी रात्री नाशिकच्या दिशेने जाणारी बस शालीमारकडे आली. शालीमार वरुन एक जोडपे बसमध्ये चढणार होते. त्यांनी बसचालकाला बस जवळ थांबवण्यास सांगितले. पण बसचालकाने गाडी जवळ थांबविली नाही. हा राग मनात ठेऊन प्रवासी माणसाने दगड उचलून चालकाच्या दिशेने भिरकावला आणि त्याला जातीवाचक शिव्या देण्यास सुरुवात केली. योगेश जगताप असे या चालकाचे नाव असून त्याने तातडीने भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्याने या जोडप्याविरोधात गुन्हा दाखल केला.

वाचा- आता पुणेकरांना हेल्मेट घालावेच लागणार!

शालीमारकडील रस्ता अरुंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाने बस जवळ नेण्यास नकार दिल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आहे. शालीमारकडील रस्त्यांवर दुकाने वाढली आहेत. त्यामुळे येथील भाग अरुंद झाला आहे. येथे बस आणताना चालकांना त्रास होतो, अशा अनेक तक्रारी या आधी समोर आल्या आहेत. शिवाय चालकांनाही मारहाण केल्याचे प्रकार या आधी घडले आहेत.

First Published on: November 17, 2018 2:53 PM
Exit mobile version