केंद्राने नुपूर शर्मा, जिंदालांवर आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी कारवाई करावी; वळसे पाटलांची मागणी

केंद्राने नुपूर शर्मा, जिंदालांवर आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी कारवाई करावी; वळसे पाटलांची मागणी

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्याविरोधात जगभरातून रोष वाढतोय. या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी आज महाराष्ट्रातही मुस्लीम समाजाने तीव्र आंदोलन केले. सोलापूर, औरंगाबाद, जालना, अहमदनगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. तर अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांनी बंदची हाक दिली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip Walse Patil) यांनी केंद्र सरकारने नुपूर शर्मा, जिंदाल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांची दखल घेतल कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पत्रकार परिषदेत बोलत होते. (Center govt take action against Nupur Sharma, Jindal for Prophet Muhammad offensive statements Demand dilip Walse Patil)

यावेळी वळसे पाटील म्हणाले की, “आपल्या सर्वोच्च श्रद्धास्थानाबद्दल जर अशाप्रकारे चुकीचे उद्गार कोण काढत असेल तर त्याचा राग सगळ्यांच्या मनात असणं स्वाभाविक आहे. पण यानिमित्ताने एवढचं सांगत की, ज्या नुपूर शर्मांनी अशाप्रकारे चुकीचे उद्गार काढले किंवा नवीनकुमार जिंदाल यांनी जे उद्गार काढले त्याप्रकरणी महाराष्ट्रातही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाल्या आहेत. पोलीस त्याची पूर्ण दखल घेतलीचं परंतु केंद्र सरकारने याची दखल घेत कडक कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. (Prophet Muhammad offensive statements)

“महाराष्ट्रात अशाप्रकारचे आंदोलन होणार असल्याची माहिती कालचं महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. त्या दृष्टीकोणातून राज्यातील सर्व पोलीस युनिट्सला सावध करण्यात आले होते, तसेच बंदोबस्ताच्या दृष्टीने तयारी करण्यास सांगितली होती. आज हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा त्याचा आढावा घेतला. सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि महाराष्ट्रातील काही भागातील मुस्लिम समाजातील बांधवांनी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केलं आहे,” अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

“महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी धन्यवाद देईन की आपण शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं आहे, कमिश्नर, कलेक्टर, तहसीलदार यांनी भेटून आपलं निवेदन दिलं आहे. पोलिसांनी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली आहे आणि मुस्लीम समाजानेही मदत केली आहे. कुठल्याही प्रकारचा कटू प्रसंग घडलेला नाही,” अस देखील गृहमंत्री म्हणाले.

मुस्लीम समाज, हिंदु समाज आणि इतर समाजाला आवाहन आहे की, आपल्या श्रद्धास्थानांचा आपण आदर करतोच पण दुसऱ्यांच्या श्रद्धास्थानाचं अनादर करण्याचं काम कोणी करु नये, या महाराष्ट्रात अनेक बाकीचे प्रश्न आहेत. त्या दृष्टीने सर्वांनी परिस्थिती शांत ठेवण्याच्या दृष्टीकोनातून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून सहकार्य करण्याची विनंती’ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.


नुपूर शर्मा प्रकरण महाराष्ट्रात तापलं! औरंगाबादमध्ये आंदोलन, अहमदनगरमध्ये पुकारला बंद

First Published on: June 10, 2022 5:51 PM
Exit mobile version