महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे प्रत्युत्तर 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते; उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे प्रत्युत्तर 

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 14 मे रोजी वांद्रे कुर्ला संकुलन (बीकेसी) येथे मास्टर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष भारतीय जनता पार्टी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हल्लाबोल केला. त्यांच्या या सभेनंतर भाजपाच्या नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस यांची सभा झाली या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. तसंच, आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते”, असं त्यांनी म्हटलं.

“१४ तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फार मोठा गौवगवा करून मुंबई बीकेसीमध्ये जाहीर सभा घेतली. कुठलीही निवडणुक नाही. अस असताना मुख्यमंत्री पदावर असताना एवढ्या जाहीरात बाजी करून सभा घ्यावी लागली. शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सभा घेतली. पण महाराष्ट्रातील आणि देशभरातील जनतेने सभा किती भरली होती आणि खर्च किती केला. याचा अंदाज केला असेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  हे म्हणायला मला लाज वाटते. महाराष्ट्राचा इतिहास माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते काल पर्वा देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले. त्यानी आपली प्रतिमा आणि राज्याची प्रतिमा वाढवण्याचे काम केलं. सर्व दिग्गज होते. राज्यातूननंतर दिल्लीला अनेकजण गेले. देशातही आपली कारकिर्द आपल्या कर्तृत्वाने गाजवली. हा इतिहास महाराष्ट्राचा आणि मुख्यमंत्र्यांचा असताना पर्वाचा भाषण ऐकल्यानंतर वाईट वाटलं. मी अपेक्षित नव्हतो.”, अशा शब्दांत नारायण राणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

“मी शिवसेनेत वयाच्या १५ व्या वर्षी प्रवेश घेतला. २ रुपयांची पावती फाडून सभासद झालो. सलग ३९ वर्ष त्या पक्षात होतो. साहेबांचे विचार, विचारसरणी. त्यांचे राष्ट्रप्रेम हिंदूत्वप्रेम. मराठी माणसाबद्दलची आस्था हे सगळं मी जवळून पाहिलं, कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता स्वार्थ न बाळगता परखडणे बोरणारं देशातलं आणि जगातलं एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे.”

“चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूसकीचा धर्म आम्हाला आमच्या साधूसंतानी शिकवाला. साहेबांच्या तोंडून शब्द निघाला की तसंच वागणार.”, असंही त्यांनी म्हटलं.


हेही वाचा – नाना पटोलेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार, आता अजितदादा म्हणतात…

First Published on: May 16, 2022 5:44 PM
Exit mobile version