मध्ये रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा नियमित गाड्यांसह पूर्ववत, पहा संपर्ण वेळापत्रक

मध्ये रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा नियमित गाड्यांसह पूर्ववत, पहा संपर्ण वेळापत्रक

मध्ये रेल्वेवरील विशेष गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा नियमित गाड्यांसह पूर्ववत करण्यात आल्या आहेत. चाळीसगाव आणि धुळे दरम्यान मेमू विशेष सेवा देखील पूर्ववत पुढील सुचनेपर्यंत काही विशेष गाड्यांच्या सेवा नियमित गाड्यांप्रमाणे पूर्ववत केल्या गेल्या आहेत आणि आता या गाड्यांसाठी आरक्षण बुकिंग उघडण्याची तारीख १२ डिसेंबर २०२१ आहे.

सामान्य शुल्कासह

12811 लोकमान्य टिळक टर्मिनस -हटिया द्वि-साप्ताहिक,
20821 पुणे-संत्रागाछी साप्ताहिक,
22893 साईनगर शिर्डी -हावडा साप्ताहिक.

फ्लेक्सी शुल्कासह

12261 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हावडा दुरांतो

20821 / 20822 पुणे -संत्रागाछी- पुणे साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस म्हणून हमसफर शुल्कासह संत्रागाछी येथून ९ मार्च २०२२ पासून आणि पुणे येथून ११ मार्च २०२२ पासून चालेल. या गाड्यांची १२ डिसेंबर २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर बुकिंग सुरू होईल.

चाळीसगाव आणि धुळे दरम्यान मेमू विशेष सेवा पूर्ववत

चाळीसगाव आणि धुळे दरम्यान १३ डिसेंबर २०२१ पासून पुढील सुचनेपर्यंत मेमू सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. 01303 मेमू दर सोमवार ते शनिवार ०६.३० वाजता चाळीसगाव येथून सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी ०७.३५ वाजता पोहोचेल. 01304 मेमू धुळे येथून दर सोमवार ते शनिवार ०७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ०८.५५ वाजता चाळीसगावला पोहोचेल. 01313 मेमू चाळीसगाव येथून दर सोमवार ते शनिवार १७.३० वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी १८.३५ वाजता पोहोचेल. 01314 मेमू धुळे येथून दर सोमवार ते शनिवार १९.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.२५ वाजता चाळीसगाव येथे पोहोचेल.

दोन्ही गाड्यांची संरचना ८ मेमू कोच असणार आहेत. या गाड्या बोरस बुद्रुक, जामधा, राजमाने, मोरदड तांडा, शिरूड, बोरविहीर आणि मोहाडी प्रागणे ललींग येथे थांबतील. या मेमू ट्रेन अनारक्षित एक्स्प्रेस शुल्कासह धावतील. प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपीचे पालन करावे.


हेही वाचा – MHADA Exam: कोणत्याही अफवांना बळी पडू नका, आव्हाडांच आवाहन

First Published on: December 10, 2021 8:47 PM
Exit mobile version