घरताज्या घडामोडीMHADA Exam: कोणत्याही अफवांना बळी पडू नका, आव्हाडांच आवाहन

MHADA Exam: कोणत्याही अफवांना बळी पडू नका, आव्हाडांच आवाहन

Subscribe

म्हाडाच्या परीक्षेबाबत अनेक अफवा पसरविल्या जात असून काही लोक पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि कुणालाही पैसे देऊ नका, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केले. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे अशाच अफवा सुरू राहिल्यास प्रसंगी ही परीक्षाच मी रद्द करेन, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ ट्विट करून हे आवाहन केले आहे. परवा, १२ डिसेंबरला होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेबाबत अफवा पसरवल्या जात असून काही लोक पैसेही घेत असल्याचे कानावर आले आहे. त्यामुळे जर कोणी रंगेहाथ पकडून दिले तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे कृपया कुणालाही पैसे देऊ नका, असे आवाहन आव्हाड यांनी केले.

- Advertisement -

म्हाडाची परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार आहे. मला नाशिक, अकोला तसेच आष्टीवरून फोन आले. काही ठिकाणी अधिकारी पैसे घेत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका. या परीक्षेत कोणताही वशिला चालणार नाही आणि आमचा विभाग तसे चालूही देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी अभियंता, उप अभियंता, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी, सहायक अभियंता, सहायक विधी सल्लागार, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक अशा एकूण ५६५ जागांवर म्हाडामार्फत भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राजकारण्यांनी तारतम्य सांभाळून बोलले पाहिजे, जयंत पाटलांचा सल्ला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -