नव्या सरकारमधील खातेवाटपावरून चंद्रकांत पाटलांचा फडणवीसांना सल्ला

नव्या सरकारमधील खातेवाटपावरून चंद्रकांत पाटलांचा फडणवीसांना सल्ला

chandrakant patil

मुंबई: राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे सरकार असल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. तर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा आम्हाला आदर आहे, पण आमच्या मनात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहेत, असे वक्तव्य शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम असल्याची चर्चा सुरू असताना आता चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केलेल्या वक्तव्याने नवे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा – ठाकरे आता ऑन फिल्ड! पक्षाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढणार

येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विनायक मेटे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर उपस्थित होते. दरम्यान, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आल्याचे विधान भाजप प्रद्देशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
गेली अडीच वर्षे आपण वाट बघत होतो, रात्रीनंतर दिवस उजाडतो. आज आता आपले सरकार आले आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा सर्वाँना न्याय मिळत होता. आता मराठा समाज आणि ओबीसींना न्याय मिळेल, असे पाटील म्हणाले.

हे ही वाचा – सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करा, मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश

“बदला” खाते सुरू करा

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला. नवीन सरकारमध्ये “बदला” असे नवीन खाते सुरू करून त्याची जबाबदारी कडक आमदाराकडे द्या आणि गेल्या सरकारमध्ये ज्या मंत्र्यांनी घोटाळे केले त्यांना शोधून काढा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे ही वाचा –  मीच शिवसेनेतून बाहेर पडलो, हकालपट्टी कशी करणार? विजय शिवतारे यांचा पलटवार

First Published on: July 16, 2022 7:22 PM
Exit mobile version