१० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार, चंद्रकांत पाटलांचं भाकीत

१० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार, चंद्रकांत पाटलांचं भाकीत

राज्यातील महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले असून आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की महाविकास आघाडीला सत्तेतून जावे लागेल, असे राजकीय भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पिंपरी- चिंचवडमध्ये बोलताना केले.

भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पाटील यांनी आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना पाटील यांनी महाविकास आघाडीचे सत्तेतून पायउतार होणे अटळ असल्याचा दावा केला.

आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले. तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती आणि ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता. या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत, असे पाटील यांनी सांगितले

अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल, असा दावाही त्यांनी केला.


हेही वाचा : IPL Auction 2022 : यंदाच्या आयपीएलमध्ये कट्टर शत्रू एकाच संघात खेळताना दिसणार, चर्चेला उधाण


 

First Published on: February 12, 2022 7:46 PM
Exit mobile version