अधिवेशनाच सोमवारपासून ST आंदोलन अन् मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणार- चंद्रकांत पाटील

अधिवेशनाच सोमवारपासून ST आंदोलन अन् मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणार- चंद्रकांत पाटील

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून लढा सुरु आहे. त्यामुळे मराठा आमदारांनी मराठा आरक्षणासाठी एकत्र येत अधिवेशनात याविषयी आवाज उठवावा असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच ठाकरे सरकार राज्यातील समस्या आणि मुद्दयांबाबत गंभीर नसल्याची टीका करत अधिवेशनात सोमवारपासून ST आंदोलन अन् मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणार असा इशारा त्यांनी दिला आहे. कोल्हापूरात ते आज प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोल्हापूर उत्तरची निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. ठाकरे सरकार राज्यातील मुद्द्यांवर गंभीर नसल्याने सोमवारपासून एसटी आंदोलन आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

गोवा, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक जिंकलेला तो उत्साह अजूनही कायम आहे. त्याचा पुरेपुर वापर आता या निवडणुकीच्या कार्यासाठी लावणार आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.


Holi 2022 : मौनी रॉयने लग्नानंतर पहिल्यांदाच पती सूरज नांबियारसोबत साजरी केली होळी

First Published on: March 18, 2022 2:07 PM
Exit mobile version