घरमनोरंजनHoli 2022 : मौनी रॉयने लग्नानंतर पहिल्यांदाच पती सूरज नांबियारसोबत साजरी केली...

Holi 2022 : मौनी रॉयने लग्नानंतर पहिल्यांदाच पती सूरज नांबियारसोबत साजरी केली होळी

Subscribe

मौनी रॉयचे हे फोटो चाहत्यांनाही आवडले आहेत.

देशभरात आज होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा सण काही बी-टाऊन सेलिब्रिटींसाठी देखील सुपर स्पेशल आहे. कारण काही सेलिब्रिटी लग्नानंतर पहिल्यांदाच होळी साजरी करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयसाठीही ही होळी स्पेशल आहे. कारण लग्नानंतरची ही तिची पहिलीच होळी आहे. मौनी रॉयने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मौनी पती सूरज रोमँटिक स्टाईलमध्ये एकमेकांकडे रोमँटिक अंदाजात पाहत आहेत. तर दोघांनी हातावर होळीचा रंग लावला आहे. एका फोटोमध्ये मौनी रॉय पती सूरज नांबियारच्या पायाला स्पर्श करताना दिसतेय. यातून दोघेही पहिल्यांदाच एकत्र होळी साजरी करताना किती आनंदी आहेत हे दिसून येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

- Advertisement -

तर तिसऱ्या एका फोटोमध्ये मौनी रॉय पतीच्या चेहऱ्यावर रंग लावत आहे. मौनी रॉयने सूरज नांबियारसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि हास्याच्या रंगांनी भरून जावोत. होळीच्या शुभेच्छा.’ अशाप्रकारे तिने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. मौनी रॉयचे हे फोटो चाहत्यांनाही आवडले आहेत. अनेक चाहते तिच्या फोटोवर कमेंट्स करत आहेत. इतकंच नाही तर फिल्म स्टार्सही मौनीच्या फोटोवर कमेंट करत आहेत.

मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या मौनी रॉय ‘डीआयडी लिटिल मास्टर’च्या सीझन 5 ची जज म्हणून दिसत आहे. मौनी आजकाल रेमो डिसूझा आणि सोनाली बिंद्रासोबत चाईल्ड डान्सर्सना मोटिव्हेट करताना दिसतेय. याशिवाय ती ब्रह्मास्त्र या चित्रपटातही दिसणार आहे.


‘The Kashmir Files’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना ‘Y’ कॅटेगरी सिक्युरिटी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -