महाराष्ट्रातून प्रकल्प गेल्याचा कांगावा करणं चुकीचं; ‘त्या’ प्रकल्पावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रातून प्रकल्प गेल्याचा कांगावा करणं चुकीचं;  ‘त्या’ प्रकल्पावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्रातून फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज पार्कनंतर आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पही राज्याबाहेर गेल्याने पुन्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगणार आहे. अशात हा प्रकल्पही तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेल्याचा दावा शिंदे फडणवीस सरकारने केला आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक वेळी प्रकल्प महाराष्ट्रातून गेला असा कांगावा करणं अतिशय चुकीचं आहे, यामुळे महाराष्ट्राची तर बदनामी होतेच पण जे अधिकारी यासाठी पाठपुरावा करतात आणि हा प्रकल्प आपल्याकडे यावा यासाठी प्रयत्न करतात तेही हतोत्साहित होतात. अधिकारीही अर्ज सादर करावी की नाही.. कारण उद्या तो प्रकल्प आला नाही तर तो महाराष्ट्रातून पळवला गेला अशाप्रकारचा कांगावा केला जातो अस उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. (cm eknath shinde dcm devendra fadanvis on energy equipment manufacturing zone)

तसेच कोणतीही माहिती न घेता शिंदे फडणवीसांचे फोटो छापून टाकणं आणि जुन्या सरकारच्या काळात गेलेले प्रकल्प आमच्या नावाने दाखवणं तात्काळ बंद करा अशी विनंतीही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

या प्रकल्पाची टाईम लाईन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे, कोणतीही टाईम लाईन आमच्या सरकारमधील नाही. केंद्र सरकारने अशाप्रकारचे तीन पार्क करण्याचं ठरवलं आहे, त्यातील एक त्यांनी दिलेला आहे, दोन अजून दिलेले नाहीत. केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये योजना करत असते, यासाठी सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागवला जातो. मात्र यातील एक किंवा दोन राज्यांचा प्रस्ताव मान्य केला जातो. अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे.

प्रकल्प म्हणजे जादूची कांडी नाही

दरम्यान यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोणताही मोठा प्रकल्प केवळ 3, 4 महिन्यांत राज्यात येतो किंवा राज्यातून जातो, असे होत नाही. प्रकल्प म्हणजे काही जादूची कांडी नसते. विकासकामांना प्राधान्य देणारे आमचे सरकार आहे. आता उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन आमच्यावर आरोप करण्यात येत आहे. आरोप कुणीही करू शकतो. मात्र, आमचे सरकार येऊन जेमतेम 3, 4 महिने झाले आहे. केवळ चार महिन्यांत असे प्रकल्प येत आणि जात नसतात. असं मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा : महाराष्ट्रातून आणखी एका प्रकल्पाचा शॉक; ‘ऊर्जा उपकरणनिर्मिती झोन’ हातून निसटला

First Published on: November 12, 2022 4:51 PM
Exit mobile version