महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांची नावं आमच्याकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांची नावं आमच्याकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

महाराष्ट्र सरकार देखील लवकरच सीमा वासीयांचा ठराव ठेवणार आहे. परंतु जे आंदोलनं होत आहेत यामध्ये कोणत्या पक्षाचे लोकं आहेत, याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. खरं म्हणजे आपल्या राज्याबद्दल प्रेम आणि कर्तव्य हे प्रत्येकाने समजलं पाहीजे. परंतु आपल्या राज्याची बदनामी कोण करत आहेत. यासंदर्भात देखील आमच्याकडे माहिती आली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सीमा प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे. हा गेल्या चार ते पाच महिन्यांचा प्रश्न नाहीये. पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावलं. कारण बेळगावमध्ये आपले मराठी बांधव राहतात. त्यांना त्रास होऊ नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी आम्ही विनंती केल्यानंतर तात्काळ त्यांनी हस्तक्षेप केला. हा विषय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी कुठलाही नवीन विषय आणि नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही बैठक घेतली आहे. राज्य सरकार सीमावासियांच्या पाठिशी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावलं. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या. हा विषय ६० वर्षांपासूनचा आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काहीही परिणाम होऊ नये, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच याची काळजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, असं शिंदे म्हणाले.

हे सरकार स्थापन झाल्यापासून सगळ्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. हे सरकार आज पडेल किंवा उद्या पडेल. परंतु त्यांच्याकडे काय लॉजिक आहे. हे सरकार चांगलं काम करत आहे. हे लोकप्रिय झालेलं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचं सरकार पूर्ण बहुमतानं निवडून येईल, अशा प्रकारचं आमचं काम सुरू आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना मोठ्या भरघोस मताने जिंकेल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

दिल्लीत आज वीर बालदिवस होता. ज्या गुरुगोविंद सिंग यांची दोन मुलं सहा आणि नऊ वर्षामध्ये ज्यांचं बलिदान झालं. त्यांचा केंद्र सरकारने वीर बालदिवस आज आयोजित केला होता. गुरूगोविंद सिंग, महाराष्ट्र आणि पंजाब यांचं जे काही नातं आहे. त्यामुळे मला केंद्र सरकारच्या या कार्यक्रमाला बोलावलं होतं. हा एक आगळा-वेगळा कार्यक्रम होता. या देशाला प्रगतीपथाकडे घेऊन जात असताना ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं. त्यांची देखील आठवण त्यांनी ठेऊन वीर बालदिवसाची घोषणा केली, याबद्दल मी पीएम मोदींचा आभारी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : कर्नाटक वादावर बोलणाऱ्यांनीच योजना बंद केल्या, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला


 

First Published on: December 26, 2022 8:20 PM
Exit mobile version