घरताज्या घडामोडीकर्नाटक वादावर बोलणाऱ्यांनीच योजना बंद केल्या, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

कर्नाटक वादावर बोलणाऱ्यांनीच योजना बंद केल्या, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

Subscribe

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून विरोधक राज्य सरकावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लाठ्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसणे असा अर्थ होत नाही हल्लाबोल केला होता. तसेच मुख्यमंत्री हे दिल्लीऐवजी आता मुंबईत पाहीजे होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, कर्नाटक वादावर बोलणाऱ्यांनीच योजना बंद केल्या, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली. उद्या कर्नाटकविरोधात प्रस्ताव आणण्याआधी भेटीला गेल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, दिल्लीत आज वीर बालदिवस होता. ज्या गुरुगोविंद सिंग यांची दोन मुलं सहा आणि नऊ वर्षामध्ये ज्यांचं बलिदान झालं. त्यांचा केंद्र सरकारने वीर बालदिवस आज आयोजित केला होता. गुरूगोविंद सिंग, महाराष्ट्र आणि पंजाब यांचं जे काही नातं आहे. त्यामुळे मला केंद्र सरकारच्या या कार्यक्रमाला बोलावलं होतं. खरं म्हणजे बोलणाऱ्यांनी माहिती घेतली पाहिजे होती की, मी कुठल्या कार्यक्रमाला चाललोय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावलं. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या. हा विषय ६० वर्षांपासूनचा आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर काहीही परिणाम होऊ नये, याची काळजी आम्ही घेत आहोत. तसेच याची काळजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जे आता बोलताहेत त्यांनी तर योजना बंद केल्या होत्या. मुख्यमंत्री धर्मदाय निधी, महात्मा ज्योतिबा आणि अनेक निधी बंद केले होते. परंतु हे सर्व निधी आम्ही सुरु केले. २ हजार कोटींच्या म्हैसाळ विस्तारीकरणाची योजना आम्ही मंजूर केली. तसेच त्या सीमा आंदोलनात मी जेल भोगलंय. त्यामुळे आम्हाला इतर लोकांनी काहीही शिकवण्याची आवश्यकता नाही. हे सरकार सीमावासियांच्या पाठिशी पूर्णपणे आणि खंबीरपणे उभं आहे. तसेच या प्रकरणाचा ठराव आम्ही उद्या आणणार आहोत, असंही शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : कर्नाटकातील मराठी भाषिकांवरील अत्याचार रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुचवले ‘हे’ पर्याय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -