Ex Minister : चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीतील पक्षात प्रवेश करणार, मुख्यमंत्र्यांचे विधान

Ex Minister : चंद्रकांत पाटील महाविकास आघाडीतील पक्षात प्रवेश करणार, मुख्यमंत्र्यांचे विधान

महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवस वाट बघा, असे म्हणत एकच खळबळ उडवून दिली होती. चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा रंगली. त्यांच्या अशा विधानाने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले. भाजप महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबविणार का ? याबाबतची चर्चा चंद्रकांत पाटलांच्या विधानाने सुरू झाली. पण आज शुक्रवारी दिवसभरात शिवसेनेकडून या विधानाची चांगलीच फिरकी घेतली गेली आहे. सकाळीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा देत चिमटा काढला, त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. (CM uddhav thackeray comment on chandrakant patil statement as ex minister)

तर २५ वर्षे माजी रहावे लागेल 

चंद्रकांतदादा पाटील हे आमचे मित्र आहेत. जुने साथीदार आहेत. मला माजी मंत्री म्हणून नका, ही त्यांची वेदना समजू शकतो. त्यांनी दोन तीन दिवस थांबा बोललेले मी एकले. पण मी चंद्रकांतदादांना निरोप पाठवला आहे की, तुम्हाला येत्या २५ वर्षे माजी म्हणून रहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्त्वात आगामी २५ वर्षे सत्तेत राहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आगामी २५ वर्षे माजी म्हणून रहावे लागेल असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांची नेमणूक नागालॅंडची राज्यपाल म्हणून होत आहे असे मला कळाले. त्यामुळे नागालॅंडचे राज्यपाल म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी येणार असल्यानेच कदाचित त्यांनी असे वक्तव्य केले असावे असाही टोला राऊतांनी लगावला. नागालॅंडचे राज्यपाल होण्याची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी आली असल्याचे कळाले आहे, असेही राऊतांनी यावेळी सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

औरंगाबाद दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी अतिशय सहजपणे या प्रश्नावर उत्तर दिले. मला माजी म्हणून नका, येत्या दोन दिवसात घडतय काय ते पहा असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय हजरजबाबी असे उत्तर दिले. चंद्रकांत पाटील हे महाविकास आघाडीतील तीनपैकी एका पक्षात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


हेही वाचा – मला माजी मंत्री म्हणू नका, एक-दोन दिवसांत कळेल


 

First Published on: September 17, 2021 1:59 PM
Exit mobile version