घरमहाराष्ट्रमला माजी मंत्री म्हणू नका, एक-दोन दिवसांत कळेल

मला माजी मंत्री म्हणू नका, एक-दोन दिवसांत कळेल

Subscribe

चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असे म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले आहेत.

पिंपरी चिंचवड जवळील देहूगावमधील एका खाmगी कार्यक्रमात मंचावरून सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, असे म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत पाटलांनी दिले. यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने राज्यात पुन्हा भाजपा सरकार येणार की दुसरा काही मोठा राजकीय भूकंप होणार, असा प्रश्नही सर्वांनाच पडला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे मात्र राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. तसेच पाटील यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पाटील यांच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ असावा, याचे राजकीय कंगोरे उलगडण्याचा बरेच जण प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

देहूगाव येथे एका खासगी दुकानाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होते. उद्घाटन करण्याच्या अगोदर सूत्र संचालन करणार्‍या व्यक्तीने माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन होत असल्याचं म्हटलं, तसेच वारंवार तसाच उल्लेख केला. त्यानंतर उद्घाटनासाठी रिबीन कापणार त्याच वेळी चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य करत माजी मंत्री म्हणून नका दोन-तीन दिवसात कळेल असे म्हटले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, त्यांनी केलेल्या सूचक विधानाचा नेमका अर्थ काय आहे हे येणार्‍या दोन-तीन दिवसात कळेल. तसेच विरोधक देखील त्यांच्या सूचक विधानाकडे कसे पाहतात हे देखील पाहावे लागणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -