CNG Price Down: १ एप्रिलपासून राज्यात CNG स्वस्त होणार, अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची उद्यापासून अंमलबजावणी

CNG Price Down: १ एप्रिलपासून राज्यात CNG स्वस्त होणार, अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची उद्यापासून अंमलबजावणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेनंतर CNG वरील व्हॅट कपातीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीएनजीवरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे. येत्या १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत.

अर्थसंकल्पातील घोषणेची अंमलबजावणी १ एप्रिलपासून केली जाणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार महाराष्ट्रात सीएनजीवरील व्हॅट ३ टक्के करण्यात आला आहे. व्हॅट कमी झाल्यामुळे सीएनजीची किंमत स्वस्त होणार असून त्यामुळे सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

इंधनवाढीच्या दरवाढीच्या पाश्वभूमीवर सीएनजीचे दर कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. मुंबईत सध्या सीएनजीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर ते ६६ रुपये प्रति किलो आहे, तर पीएनजीचा दर ३९.५० रुपये प्रति मानक घनमीटर इतका आहे. परंतु उद्यापासून सीएनजीच्या किंमतीमध्ये ६० रूपये प्रति किलो आणि पीएनजीच्या दरामध्ये ३६ रूपये प्रति मानक घनमीटर इतका कमी करण्यात येणार आहेत.

CNG च्या किंमतीत मुंबईतील सध्याच्या किंमतीच्या पातळीवरील पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत ६५ टक्के आणि ४१ टक्क्यांची बचत करता येणार आहे. तसेच पीएनजीच्या तुलनेत एलपीजीमध्ये ३२ टक्क्यांची बचत होणार आहे. देशाच्या राजधानीत सीएनजीच्या दरात ५० पैशांनी वाढ झाली आहे. या वाढीनंतर राष्ट्रीय राजधानीत सीएनजीची किंमत ५७.५१ रुपये प्रति किलो झाली आहे. याशिवाय नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीच्या किमतीत १ रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीची किंमत आधीच कमी आहे. अशा परिस्थितीत कार चालकांसह ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि कॅब चालकांना त्यांच्या किंमतीत कपातीचा फायदा होणार आहे.


हेही वाचा : Women’s World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इंग्लंडची अंतिम फेरीत धडक, या संघाशी होणार सामना


 

First Published on: March 31, 2022 7:43 PM
Exit mobile version