शरद पवारांच्या निवृत्तीने ‘मविआ’वर काय परिणाम होणार? अशोक चव्हाण म्हणाले…

शरद पवारांच्या निवृत्तीने ‘मविआ’वर काय परिणाम होणार? अशोक चव्हाण म्हणाले…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज अध्यक्षपदावरून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. शरद पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या महाविकास आघाडीवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. नेतृत्व हे बदलत राहत’, असे म्हटले.

अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधनाता शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेवर भाष्य केले. “निवृत्ती घेणे हा शरद पवार यांचा वैयक्तिक निर्णय आहे. शरद पवारांसारखा अनुभवी ज्येष्ठ नेत्याने अचानाक राजीनामा देणे हे खटकणारी बाब आहे”, असे अशोक चव्हाण म्हणाले. (Congress Ashok Chavan effect of Sharad Pawar retirement on MVA)

“केंद्र पातळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन आगामी काळात भाजपाच्याविरोधात ताकद उभी करत असताना शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय ही न पटणारी बाब आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाता अंतर्गत निर्णय आहे”, असे अशोक चव्हाण म्हणाले.

“शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. नेतृत्व हे बदलत राहत. पण अनुभवी नेता या प्रक्रियेतून बाहेर पडला तर नुकसान होईल. त्यामुळे त्यांचे राहणे गरजेचे आहे, असे मला वाटतं. पण हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचा असून, याबाबत समिती नेमण्यात आली आहे त्या समितीला पुढील निर्णय घ्यावा लागणार आहे. या समितीने सध्याच्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून शरद पवारांना फेरविचार करायला सांगावे अशी आमची विनंती आहे”, असे अशोक चव्हाण म्हणाले.


हेही वाचा – शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी

First Published on: May 2, 2023 3:38 PM
Exit mobile version