मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत?

मराठा आरक्षणासाठी काँग्रेस आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत?

काँग्रेसचे राज्यातले उमेदवार निश्चित

दिवसेंदिवस मराठा आरक्षणावरून राज्यातील वातवरण तापत असून, आता विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असून, आज झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत आमदारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबत काँग्रेस पक्षाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसच्या आमदारांची आज विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडला.

काय म्हणालेत चव्हाण

मराठा, मुस्लीम, धनगर व इतर समाजांच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात काँग्रेस आमदारांच्या भावना तीव्र असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सरकारने जनतेच्या संयमाची अधिक परीक्षा न पाहता आणि सध्याच्या इतर प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासह इतर आरक्षणासंदर्भातील निर्णय तातडीने जाहीर करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान याबद्दल अशोक चव्हाण यांना विचारले असता त्यांनी आमदारांच्या भावना तीव्र आहेत, राजीनामा देण्याबाबत निर्णय झाला पण निष्कर्ष झाला नाही. याबाबत मतभेद आहेत. पण आम्ही सभागृहात आरक्षणाबाबत सरकारला जाब विचारणार असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने घेतली राज्यपालांची भेट

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राजभवनावर जाऊन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली. राज्यातील सध्याची परिस्थिती स्फोटक असून, यामध्ये आपण हस्तक्षेप करावा असे शिष्टमंडळाने यावेळी राज्यपालांना सांगितले.

First Published on: July 30, 2018 8:40 PM
Exit mobile version