गॅस दरवाढ व महागाई विरोधात महिला काँग्रेसच राज्यभर आंदोलन, मोदी सरकारचा महिलांकडून निषेध

गॅस दरवाढ व महागाई विरोधात महिला काँग्रेसच राज्यभर आंदोलन, मोदी सरकारचा महिलांकडून निषेध

गॅस दरवाढ व महागाई विरोधात महिला काँग्रेसच राज्यभर आंदोलन, मोदी सरकारचा महिलांकडून निषेध

देशात कोरोना संकटामुळे नागरिक आर्थिक संकटात आले आहे. यामध्ये घरगुती गॅस व जीवनाश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ करण्यात आली आहे. या महागाईमुळे केंद्रातील भाजप सरकारविरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे महिलांनी आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केला.

स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढलेल्या किंमती विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आक्रमक झाली असून. आज राज्यातील सर्व जिल्ह्यात महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, सत्तेवर आल्यावर १०० दिवसांत महागाई कमी करु असे आश्वासान नरेंद्र मोदींनी दिले होते पण सत्तेवर येऊन सात वर्ष झाल्यानंतरही ते महागाई कमी करू शकले नाहीत. किंबहुना ते सत्तेवर आल्यापासून दररोज महागाई वाढतच चालली आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोडमडले आहे. उज्वला गॅसची सबसिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर परत करून मोदी सरकारचा निषेध करत आहेत.

यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष पूजा आनंद म्हणाल्या की, मोदी सत्तेवर आल्यापासून सातत्याने वाढणा-या महागाईमुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. महिलांनी चुल सोडून गॅसचे कनेक्शन घेतले पण सिलेंडरचे दर १००० रुपयांवर गेल्यामुळे त्यांना पुन्हा चुलीकडे वळण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे महिलां मध्ये प्रचंड आक्रोश असून देशातील महिला मोदींनी धडा शिकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.


हेही वाचा : St worker strike : एसटी डेपोच्या जमिनी लाटण्यासाठी संप लांबवला जातोय, चंद्रकांत पाटलांचा आरोप

First Published on: January 16, 2022 9:39 PM
Exit mobile version