Coronavirus Live Update: पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ०७५ रूग्णांचा मृत्यू

Coronavirus Live Update: पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ०७५ रूग्णांचा मृत्यू

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांत १ हजार ८८ नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. तर ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण ३८ हजार ५०२ कोरोनाबाधित असून १ हजार ०७५ इतक्या रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यासंबंधीची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान कोविड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभाग कार्यालय हद्दीत जुहू भागात निवास स्थान असलेले, प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर काल रात्री स्वतः जाहीर केली आहे. ते राहात असलेल्या भागातील त्यांचे चारही बंगले आज महानगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) म्हणून घोषित केले आहेत.


नवी मुंबईत ३१३ तर पनवेलमध्ये १५२ नवे रुग्ण 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक म्हणजे ३१३ रुग्ण वाढले. त्यामुळे रुग्णांची संख्या ९४४५ एवढी झाली आहे. रविवारी २०० रुग्ण कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण ५६५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत ३४९० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रविवारी नवी मुंबईत आणखी ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला तर मृत्यूंची एकूण संख्या ३०३ वर गेली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी १५४ नवे रुग्ण वाढले. रुग्णांचा आकडा ३८३४ वर गेला आहे. रविवारी पनवेलमध्ये ९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत आतापर्यंत पनवेल मनपा क्षेत्रातील २३१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्यस्थितीत पनवेलमध्ये २३१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ९६ जणांचा मृत्यू झाला आहे.


अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या हे दोघेही कोरोनाबाधित झाले असून ते घरातच क्वारंटाईन होणार असल्याची माहिती अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.


मुंबईतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

डी एन नगर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव यांना कोरोनाची लागण झाली होती. ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र आज त्याचे कोरोनाने निधन झाले आहे.


नानावटी रूग्णालयाने दिले स्पष्टीकरण 

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एप्रिल २०२० मध्ये आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी प्रेरित करण्यासाठी एक व्हिडिओ तयार केला तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडिओ ताजा नसून जुना असल्याचे स्पष्टीकरण नानावटी रूग्णालयाने दिले आहे.


रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या, किटचा अभ्यासासाठी समिती गठीत

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने कोरोना निदानासाठी शिफारस केलेल्या विविध रॅपीड ॲण्टी बॉडीज चाचण्या किंवा किटचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत चार सदस्यीय समिती गठीत केली आहे. विविध कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या किटचा अभ्यास करून समितीला दहा दिवसात शासनाला अहवाल सादर करावा लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. (सविस्तर वाचा)

 


मुंबईत आज कोरोनाचे १,२६३ नवे रुग्ण

मुंबईमध्ये आज १ हजार २६३ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९२ हजार ७२० वर पोहोचली आहे. तर ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार २८५ वर पोहोचला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात २४ तासांत ७,८२७ नवे रूग्ण

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता अडीच लाखांच्या वर गेला आहे. गेल्या २४ तासांत ७ हजार ८२७ नव्या रूग्णांची नोंद राज्यात झाली असून १७३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत राज्यात २ लाख ५४ हजार ४२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी १ लाख ४० हजार ३२५ जण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १० हजार २८९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.


कोरोनामुळे राज्यात ७६ पोलिसांचा मृत्यू

देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना कोरोनाने बळी जाणाऱ्यांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा विळखा पोलीस दलात कायम असून कोरोनामुळे अन्य एका पोलिसाचे निधन झाले. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या राज्य पोलीस दलातील पोलिसांची संख्या आता ७६ झाली आहे. त्यात ६ पोलीस अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. (सविस्तर वाचा)


धारावीत आज नव्या ५ रूग्णांची नोंद

मुंबईच्या धारावी परिसरात आज कोरोनाच्या पाच नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली असून या भागातील एकूण बाधितांचा आकडा २,३७५ झाला आहे. तर दादरमध्ये ३८ नवीन रूग्णांची नोंद केली गेली तर माहीममध्ये आज १० कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहेः


वाढत्या रुग्ण संख्येमुळे भिवंडीत येत्या १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश महापालिका आयुक्त पंकज आशिया यांने दिले आहेत.


‘कोरोना’ मृत्यूच्या आकडेवारी सरकारची लपवालपवी- फडणवीस

राज्य सरकार कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत लपवालपवी करत आहेत. कारण राज्य सरकारने आतापर्यंत दाखवलेले मृत्यूचे आकडे वेगळे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोरोनाची आकडेवारी लपवण्यासाठी राज्य सरकार चाचण्या देखील कमी करत आहेत.


बच्चन कुटुंबानंतर अनुपम खेर यांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण!

अनुपम खेर यांच्या आई, भाऊ, वहिनी आणि पुतणीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या आईवर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, खुद्द अनुपम खेर (Anupam kher family corona positive) यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. खुद्द अनुपम खेर यांनीच ट्वीट करून याची माहिती दिली आहे. यासंदर्भातली अधिक सविस्तर माहिती थोडया वेळात येणं अपेक्षित आहे. (सविस्तर वाचा)


जया बच्चनसह ऐश्वर्या, आराध्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह होतो. त्यानंतर जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. (सविस्तर वाचा)


देशात २४ तासांत रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ!

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत सर्वाधिक २८ हजार ६३७ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५५१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख ४९ हजार ५५३ वर पोहोचला असून मृतांचा आकडा २२ हजार ६७४ झाला आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख ३४ हजार ६२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ लाख ९२ हजार २५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (सविस्तर वाचा)


अमिताभ बच्चन यांचे जुहू येथील जलसा, जनक आणि प्रतीक्षा हे तिन्ही बंगले पालिकेकडून सॅनिटाईज केले जाणार असून जलसा बंगल्यावर एक टीम रवाना झाली आहे.


कोरोना विषाणूने आता राजभवनात देखील शिरकाव केला आहे. राजभवनातील एका इलेक्ट्रीशियनला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तब्बल १०० जणांची कोरोना चाचणी केली असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली. या माहितीच्या आधारे आतापर्यंत आलेल्या अहवालानुसार १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इतर ५० ते ५५ जणांचे कोरोना अहवाल येणे बाकी आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचे समोर आले आहे.


अमिताभ आणि अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील बाकी सदस्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अमिताभ आणि अभिषेक यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची आठ वर्षांची मुलगी आराध्या बच्चन हिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

First Published on: July 12, 2020 7:07 PM
Exit mobile version