Cruise Drug Case: NCBला जामीन रद्द करण्याची मुभा, आर्यनला अटी कोणत्या?

Cruise Drug Case: NCBला जामीन रद्द करण्याची मुभा, आर्यनला अटी कोणत्या?

Aryan Khan:आर्यन खान एनसीबी कार्यालयात हजर

आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानला काही अटींच्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही अटीचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्याची मुभा एनसीबीला देण्यात आली आहे. आर्यन खानला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज आढळले असल्याचा आरोप एनसीबीने केला होता. मागील २६ दिवसांपासून आर्यन न्यायालयीन कोठडीमध्ये असून, आता त्याचा हायकोर्टाने काही अटींच्या आधारावर जामीन मंजूर केला आहे.

हायकोर्टात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनवाणी करण्यात आली. आर्यन खानला हायकोर्टाने अखेर जामीन मंजूर करुन दिलासा दिला आहे. आर्यन खानला कोर्टाने काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. यामध्ये आर्यनला मुंबई सोडून कुठेही बाहेर जाता येणार नाही. आर्यनला मुंबई बाहेर जायचे असल्यास तपास अधिकाऱ्यांना कळवावे लागणार आहे. तसेच आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालायत हजेरी लावण्यासाठी हजर राहावे लागणार आहे. एनसीबीनं चौकशीसाठी बोलवले तर हजर रहावे लागणार आहे. कोणत्याही कारणाशिवाय कोर्टातही यावं लागणार आहे. तर जर आर्यन खानने अटींचे उल्लंघन केले तर त्याचा जामीन रद्द करण्याची मुभा एनसीबीला असेल. यामुळे आर्यन खानला सगळ्या नियमांचे आणि अटींचे पालन करावं लागणार आहे.

मन्नतबाहेर जल्लोष

अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील बंगल्याबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर चाहत्यांनी फटाके फोडत एकच जल्लोष केला आहे. आर्यन खानच्या सुटकेची शाहरुखसह त्याचे चाहते वाट पाहत होते. मुंबईतील अनेक दर्ग्यांमध्येसुद्धा आर्यनच्या सुटकेसाठी चाहत्यांनी चादरी चढवल्या होत्या. मन्नत बाहेर अनेक चाहते शाहरुखचा फॅमिली फोटो घेऊन ‘लव्ह यू शाहरुख सर’ अशा घोषणा देत आहेत.


हेही वाचा : Cruise Drug Case : आर्यनला जामीन, २६ दिवसांत नेमकं काय घडलं?


 

First Published on: October 28, 2021 8:45 PM
Exit mobile version