घरताज्या घडामोडीCruise Drug Case : आर्यनला जामीन, २६ दिवसांत नेमकं काय घडलं?

Cruise Drug Case : आर्यनला जामीन, २६ दिवसांत नेमकं काय घडलं?

Subscribe

कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. २ ऑक्टोबर रोजी एनसीबीनं मुंबईत कॉर्डेलिया क्रूझवर कारवाई करत आर्यन खानला अटक केली होती. क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. आर्यन खानकडे देखील ड्रग्ज सापडले होते असे एनसीबीकडून सांगण्यात आले होते. आर्यन खानला गुरुवारी २८ ऑक्टोबर रोजी हायकोर्टाने जामीर मंजूर केला असून अधिकृत ऑर्डर आल्यानंतर सोडण्यात येणार आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी आर्यन खान तुरुंगातून बाहेर पडेल. आर्यन खानला२ ऑक्टोबर रोजी अटक केल्यानंतर आतापर्यंत म्हणजेच २६ दिवसांत खालीलप्रमाणे घडामोडी घडल्या आहेत.

२ ऑक्टोबर : एनसीबीनं आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझवर अटक केली. क्रूझवर ड्रग्ज प्रकरणात कारवाई कऱण्यात आली यामध्ये आर्यन खानसह, मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट आणि ८ जणांना अटक करण्यात आली.
३ ऑक्टोबर : ड्र्ग्ज प्रकरणात आणखी ८ जणांना अटक करण्यात आली. आर्यनला जे.जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. आर्यनसह दोघांना किला कोर्टात हजर करण्यात आले असून एक दिवासाची एनसीबी कोठडी दिली.
४ ऑक्टोबर : आर्यनला पुन्हा किला कोर्टात हजर करण्यात आले. एनसीबीकडून १३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीची मागणी मात्र किला कोर्टाकडून आर्यनला ७ ऑक्टोबर पर्यंत एनसीबी कोठडी दिली.
५ ऑक्टोबर : पुन्हा आर्यनला सोडून ४ जणांना किला कोर्टात हजर करण्यात आले. आर्यनच्या मोबाईलची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी, ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरु
६ ऑक्टोबर : आर्यन खानला एनसीबी कोठडीत सायन्सची पुस्तके देण्यात आली. राष्ट्रवादी नेते नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोप केले, आर्यन आणि अरबाझ मर्चंटला अटक कऱणारे के पी गोसावी आणि मनीष भानुशाली एनसीबी अधिकारी नव्हेत. मलिकांची पत्रकार परिषद घेऊन एनसीबी कारवाईवर आरोप, भानुशालीचे भाजप नेते पंतप्रधानांसह फोटो व्हायरल
७ ऑक्टोबर : आर्यन खानची एनसीबी कोठडी संपली, किला कोर्टात हजर करण्यात आले. आर्यनसह सात जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी म्हणजेच २१ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. परंतु ७ ऑक्टोबरची रात्र एनसीबी कोठडीतच,
८ ऑक्टोबर : आर्यनची कोविड टेस्ट केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी, आर्यनच्या वकिलांची सेशन कोर्टात जामिन मिळवण्यासाठी अर्ज मात्र कोर्टाने जामीन फेटाळला.
९ ऑक्टोबर : आर्यन खानला सिनेसृष्टीतून सपोर्ट, कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीची छापेमारी, एनसीबीनं काही लोकांना सोडलं असल्याचा नवाब मलिकांचा आरोप
१० ऑक्टोबर : आर्यनच्या चॅटमध्ये ड्रग्ज संदर्भातील संभाषण झाले असल्याचा एनसीबीचा दावा
११ ऑक्टोबर : समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्यात आली असल्याचा आरोप, वानखेडेंची डीजीपींकडे तक्रार, आर्यनचा जामीन अर्ज पुन्हा सेशन कोर्टाने फेटाळला
१२ ऑक्टोबर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वानखेडेंवर पाळत ठेवल्याचे आरोप फेटाळले.
१३ ऑक्टोबर : आर्यन खानची न्यायालयीन कोठडी संपली, कोर्टात युक्तिवाद झाला. आर्यनकडे ड्रग्ज मिळाले नाही परंतु कटात सहभागी असल्याचा एनसीबीचा आरोप, आर्यनचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम एक दिवसाने वाढला. वकील अमित देसाई म्हणाले की, ‘विक्रांत, इष्मीत आणि अरबाज यांच्याकडून ड्रग्स सापडले पण आर्यनकडून नाही.
१४ ऑक्टोबर : आर्यनला कोर्टाचा दिलासा नाही, न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली.
१५ ऑक्टोबर : शाहरुख खानकडून आर्यन खानला साडे चार हजार रुपयांची मनी ऑर्डर,
१६ ऑक्टोबर : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीची वांद्रे, पवई, अंधेरी परिसरात धाड, नवाब मलिकांचा पंच फ्लेचर पटेल, लेडी डॉन यांच्यावर निशाणा,
१७ ऑक्टोबर : नवाब मलिकांकडून पंचांची माहिती उघड, फ्लेचर पटेल आणि वानखेडेंचा संबंध काय? वानखेडेंकडे उत्तराची मागणी
१८ ऑक्टोबर : पुणे पोलिसांकडून आर्यनला अटक करणाऱ्या किरण गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक,
१९ ऑक्टोबर : आर्यन खान तुरुंगात, जेवत नसल्यामुळे तब्येत बिघडत असल्याची माहिती
२० ऑक्टोबर : आर्यन खानची न्यायालयीन कोठडी संपली, कोर्टात पुन्हा सुनावणी, बॉलिवूड अभिनेत्रीसोबत ड्रग्ज संबंधित आर्यनने चॅट केल्याचा खुलासा, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला,
२१ ऑक्टोबर : शाहरुख खान आर्यन खानच्या भेटीसाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहचला. शाहरुख आणि आर्यनमध्ये १० ते १५ मिनिटं भेट, भेटीदरम्यान दोघेही भावूक, २० दिवसांनी शाहरुख आर्यनला भेटला. अनन्या पांडेची चौकशी
२२ ऑक्टोबर : अनन्या पांडेची आर्यन खान सोबत चॅट बाबतची चौकशी,
२३ ऑक्टोरब : NCB ची मुंबईच्या वांद्रे परिसरात तीन ठिकाणी छापेमारी, शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानी NCB कोर्टात दाखल झाली
२४ ऑक्टोबर : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाती पंच किरण गोसावीचा बॉडिगार्ड प्रभाकर साईलचा वानखेडेंवर आरोप, आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपये मागितले असल्याचा आरोप
२५ ऑक्टोबर : अनन्या खानची पुन्हा चौकशीसाठी समन्स, अनन्या चौकशीसाठी हजर राहिली नाही. दिल्लीत वानखेडेंची चौकशी
२६ ऑक्टोबर : आर्यन खानच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनवाणी, आर्यनच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद वेळ संपल्यामुळे आर्यनचा तुरुंगातच मुक्काम
२७ ऑक्टोबर : आर्यन खानच्या जामीनावर पुन्हा सुनावणी, कोर्ट रुममध्ये गर्दी झाल्यामुळे सुनावणी उशीरा सुरु केली. मुनमुन आणि अरबाझच्या वकिलांकडून युक्तिवाद मात्र आर्यनचा तुरुंगवास पुन्हा एका रात्रीसाठी वाढला
२८ ऑक्टोबर : आर्यन खानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी सुरु, वकिल मुकुर रोहतगी यांचा युक्तिवाद, आर्यनला हायकोर्टाने दिलासा देत जामीन मंजूर केला. कोर्टाची ऑर्डर येईपर्यंत आर्यनचा मुक्काम तुरुंगात, शुक्रवारी किंवा शनिवारी आर्यन सुटण्याची शक्यता.

- Advertisement -

हेही वाचा :  Cruise Drug Case : आर्यन खानला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -