खेरवाडी पोलीस ठाण्यातील सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू

खेरवाडी पोलीस ठाण्यातील सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या अधिकाऱ्याचा मृत्यू

मुंबई: वांद्रे, खेरवाडी पोलीस ठाणे येथे भंडार कक्षात जप्त करून ठेवण्यात आलेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात ९५ टक्के भाजल्याने गंभीर जखमी झालेले सहायक फौजदार अरविंद खोत यांचा भायखळा येथील मसीना रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे खेरवाडी पोलीस ठाणे येथे भंडार कक्षात एका कारवाईच्या अंतर्गत जप्त करून आणलेला गॅस सिलिंडर ठेवण्यात आला होता. मात्र सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सदर गॅस सिलिंडरचा अचानकपणे स्फोट झाला.

या दुर्घटनेत खोत हे ९५ टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी भायखळा येथील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे खेरवाडी पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा : पर्जन्य वाहिनीवरील तुटलेल्या झाकणांकडे मुंबई पालिकेचे दुर्लक्ष; अपघाताला


 

First Published on: December 13, 2022 9:36 PM
Exit mobile version