Deglur By Election: देगलूर- बिलोली मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.४७ टक्के मतदान, वाचा आतापर्यंतचे अपडेट

Deglur By Election: देगलूर- बिलोली मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.४७ टक्के मतदान, वाचा आतापर्यंतचे अपडेट

देगलूर बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीचे मतदान प्रक्रिया सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.४७ टक्के मतदान झाले आहे. भाजपकडून सुभाष साबणे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराषट्रासह देशात एकूण ३० विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात येत आहे. तर तीन लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एका जागेवर निवडणूक घेण्यात येत आहे. ही पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची ठरत आहे. पुरुष मतदार ७३  हजार २१२ तर स्त्री मतदार ७१ हजार ३९० असे एकूण १ लाख ४४ हजार ६०२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

नांदेडमधील देगलूर बिलोली येथील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे विधानसभेची जागा रिक्त होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर कऱण्यात आली होती. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीवरुन चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरु होते. दोघांकडूनही कार्यकर्त्यांना आणि मतदारांना ऑफर आणि सल्ले दिले ते बरेच वादग्रस्त ठरले आहेत. अखेर पोटनिवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु असून दोन्ही उमेदवारांच्या निकटवर्तीयांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३१ टक्के मतदान झालं आहे. सकाळी ७ ते ९ या कालावधीत १२ टक्के मतदान पूर्ण झाले होते. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदान केंद्रावरील नावाच्या याद्यांमध्ये नावाचा घोळ झाल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण झालं होते.

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे विधानसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर महाविकास आघाडीकडून अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना संधी दिली आहे. तर शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. या भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तळ ठोकून होते तर केंद्रीय मंत्रीही प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते प्रचारासाठी उपस्थित होते.


हेही वाचा :  BY-Polls : १३ राज्यात पोटनिवडणूकीच्या मतदानाला सुरूवात, वाचा मतदानाची टक्केवारी


 

First Published on: October 30, 2021 2:46 PM
Exit mobile version