घरताज्या घडामोडीBY-Polls : १३ राज्यात पोटनिवडणूकीच्या मतदानाला सुरूवात, वाचा मतदानाची टक्केवारी

BY-Polls : १३ राज्यात पोटनिवडणूकीच्या मतदानाला सुरूवात, वाचा मतदानाची टक्केवारी

Subscribe

यंदा निवडणूक आयोगाने १३ राज्यात होत असलेल्या ३ लोकसभा आणि २९ विधानसभा निवडणूकांसाठी अनेक निर्बंध घातले आहेत. ज्या जागांसाठी लोकसभा निवडणूका होत आहेत, त्यामध्ये दादरा आणि नगर हवेली, हिमाचल प्रदेश येथील मंडी आणि मध्य प्रदेशच्या खंडवा या जागेचा समावेश आहे. देशातील १३ राज्यांमध्ये तीन लोकसभा आणि ३० विधानसभा जागांसाठीची पोट निवडणूकीसाठी आज शनिवारी मतदान होत आहे. अनेक जागांवर भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशी सरळ स्पर्धा आहे. या पोट निवडणूकीसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक निर्बंध घातले आहेत.

एकुण ९ लोकसभा क्षेत्रात विद्यमान सदस्यांच्या झालेल्या मृत्यूमुळेच याठिकाणी पोटनिवडूक लागली. मार्चमध्ये भाजपचे रामस्वरूप शर्मा यांच्या निधनाने मंडी येथील जागा रिक्त झाली होती. खंडवा संसदीय क्षेत्राच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपचे सदस्य नंद कुमार सिंह चौहान यांच्या मृत्यूमुळे याठिकाणी पोटनिवडणूक लागली. तर दादरा आणि नगर हवेली क्षेत्रातून निर्दलीय लोकसभा सदस्य मोहन डेलकर हे मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृत आढळले.

- Advertisement -

कुठे किती मतदान ?

बिहारमध्ये २ जागांवर विधानसभा निवडणूकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत २२ टक्के मतदान झाले. तर कर्नाटकमध्ये २५ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये वल्लभनगर आणि धारियावाड विधानसभा निवडणूकीसाठी २५.२३ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तेलंगणाच्या हुजुराबाद येथे झालेल्या पोट निवडणूकीत ३३.२७ टक्के मतदान झाले. मिझोरममध्ये १७ टक्के मतदान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये काही घटनांचा अपवाद सोडला तर कमी प्रमाणात मतदार उतरले आहेत.

- Advertisement -

लोकसभेच्या तीन जागांसाठी होणार निवडूणक

ज्याठिकाणी लोकसभेची पोटनिवडूणक होणार आहे त्यामध्ये दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे आणि मध्य प्रदेशच्या खंडवा या जागेचा समावेश आहे.

कोणत्या ३० विधानसभा जागांवर होणार निवडणूक ?

आसाम ५ जागांवर निवडणूक – गुसाईगाव, भवानीपुर, तामुलपुर, मरियानी और थोवरा
पश्चिम बंगाल ५ जागांवर निवडणूक – दिनहाटा, शांतिपुर, खड़दह, गोसाबा
मध्य प्रदेश ३जागांवर निवडणूक – जोबट, रैगांव, पृथ्वीपुर
हिमाचल प्रदेश ३ जागांवर निवडणूक – अर्की, फतेहपुर, जुब्बल-कोटखाई
मेघालय 3 जागांवर निवडणूक – मावरिंगकेंग, मावफलांग, राजाबाला
बिहार २ जागांवर निवडणूक – तारापुर, कुशेश्वरस्थान
कर्नाटक 2 जागांवर निवडणूक – सिंगदी, हंगल
राजस्थान 2 जागांवर निवडणूक – वल्लभनगर, धरियावद
आंध्र प्रदेश १ जागेवर निवडणूक – बडवेल
हरियाणात १ जागेवार निवडणूक – ऐलनाबाद
महाराष्ट्रात १ जागेवर निवडणूक देग्लुर
मिजोरमच्या १ जागेवर निवडणूक तुइरियल
नागालैंड १ जागेवार निवडणूक
तेलंगाना येथे १ जागेवर निवडणूक हुजूराबाद


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -