तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, हिंदू आणि हिंदुत्व नाही, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, हिंदू आणि हिंदुत्व नाही, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

तुम्ही म्हणजे महाराष्ट्र, हिंदू आणि हिंदुत्व नाही, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

आजचा दिवस हा अनेक महनियांना वंदन करण्याचा दिवस. पण काही लोकांना असे वाटते, ते म्हणजे महाराष्ट्र, त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आणि त्यांचा अवमान म्हणजे महाराष्ट्राचा अवमान. पण लक्षात ठेवा महाराष्ट्राची 12 कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही अशी म्हणण्या वेळ आली असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. महानगरपालिकेतील भ्रष्टाचार आणि कोरोना काळातील भ्रष्टाचारावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बूस्टर डोस सभेतून सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले की, त्यांना नम्रपणे सांगतो तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या अठरा पगड जातीच्या बारा कोटी लोकांनी जो प्रदेश समृद्ध केला आहे. तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र आणि त्याचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आणि त्याचा अवमान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान हे लक्षात ठेवण्याची आणि त्यांना आठवण करुन देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना सागंत असतो तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी नाही. आज सांगण्याची वेळ आली आहे तुम्ही म्हणजे हिंदू नाही, परंतु असे मी म्हणणार नाही कारण मला हिंदूंची संख्या कमी करायची नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, संपूर्ण जगाला व्यापत असताना प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा मार्ग दाखवला ते म्हणजे हिंदुत्व आहे. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

तुम्ही ज्या वेळी भ्रष्टाचार करता त्यावेळी तुमचे साथी जेलमध्ये जातात तेव्हा महाराष्ट्र बदनाम होतो आणि महाराष्ट्राचे नाव देशात बदनाम होत आहे. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. यांना वाटतो हेच मराठी, हिंदू आणि महाराष्ट्र आहेत.


हेही वाचा : फडणवीस धर्माच्या रस्त्यावर चालल्यामुळे शिवसेनेकडे अधर्म, आशिष शेलारांचा घणाघात

First Published on: May 1, 2022 8:14 PM
Exit mobile version