घरताज्या घडामोडीफडणवीस धर्माच्या रस्त्यावर चालल्यामुळे शिवसेनेकडे अधर्म, आशिष शेलारांचा घणाघात

फडणवीस धर्माच्या रस्त्यावर चालल्यामुळे शिवसेनेकडे अधर्म, आशिष शेलारांचा घणाघात

Subscribe

भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. भाजपच्या पोलखोल सभेतून आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. फडणवीस धर्माच्या रस्त्यावर चालल्यामुळे शिवसेनेकडे अधर्म राहिला आहे. महाविकास आघाडी सरकार केल्यामुळे शिवसेन अधर्माकडे जात असल्याची टीका आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील भाजपच्या बूस्टर डोसला संबोधित केले. यावेळी शेलार म्हणाले की, एकच मुद्दा मांडणार आहे. गेल्या महिनाभरापासून पोलखोलच्या सभा संपूर्ण मुंबईत करतो आहे. पोलखोल सभेत खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब हा सत्ताधारी शिवसेनेच्या कारभाऱ्यांना विचारतो आहे. कधी कधी रोज पाहिली तर त्या मधला अर्थ कळण्या अगोदर डोळ्यासमोरून जाते कारण रोजची सवय असते. काल भाषणाच्या तयारीला बसलो असताना पालिकेचे एक पत्र पाहिले आणि लोगोसुद्धा पाहिला. आपण पाहिला असेल पालिकेच्या त्या लोगो आणि एम्लेमवर अतिशय प्रामाणिकपणे योग्य लिहिले आहे. त्यात संस्कृतमध्ये लिहिले आहे. जिथे धर्म तिथेच विजय आहे. आज सांगावे वाटत देवेंद्र फडणवीस कालपर्यंत युतीमध्ये त्यांच्यासोबत होतो म्हणून धर्म त्यांच्यासोबत होता. आता तु्म्ही-आम्ही सगळे धर्माच्या रस्त्यावर चाललो आहोत म्हणून शिवसेनेकडे अधर्म राहिला आहे.

- Advertisement -

जो हनुमान चालिसाला विरोध करेल, जो राम वर्गणीला विरोध करेल. जो राम मंदिराच्या जागेवर प्रश्न निर्माण करेल. ते सोडून द्या आमच्या माहिम माटुंग्याच्या दीडशे वर्ष जुन्या मंदिराला तोडायला निघेल, जो लालबागचा राजा होऊ देणार नाही, चिंचपोकळीच्या चिंतामणी होऊदेणार नाही त्यांच्यासोबत धर्म कसा असेल. धर्माचे अधिष्टाण असलेली टोळी श्री कृष्णरुपी देवेंद्र फडणवीसांसोबत आहे. येणारा काळ मुबईकरांच्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देणारे सरकार देणारा आहे. तुमच्या आणि आमच्या भाजप पक्षाचा पुढचा काळ आहे, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.


हेही वाचा : भाजप-राष्ट्रवादीच्या २०१७ मधील छुप्या युतीची माहिती नव्हती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -