मला आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा ‘हाच’ तो प्रकार, फडणवीसांनी केला खुलासा

मला आणि कुटुंबाला अडचणीत आणण्याचा ‘हाच’ तो प्रकार, फडणवीसांनी केला खुलासा

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षाविरोधात पोलीस तक्रार केली आहे. अनिक्षानने अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्टीकरण केलं. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून माझ्या कुटुंबालाही यात गोवण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी पोलीस तपास करत होते. येत्या दोन ते तीन दिवसांत संबंधित आरोपी सापडला असता, परंतु आता वृत्तपत्रात बातमी छापून आल्याने त्याला हिंट मिळाली असेल, असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – 1 कोटीची लाच देऊ केल्याप्रकरणी अमृता फडणवीसांकडून डिझायनरविरोधात एफआयआर

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याप्रकरणी सभागृहात पाँईट ऑफ इन्फोर्मेशन मांडला. एका वृत्तपत्रात छापून आलेल्या वृत्ताचा हवाला देत पवारांनी याबाबत फडणवीसांकडून स्पष्टीकरण मागितंल. देवेंद्र फडणवीसांनीही याप्रकरणी संपूर्ण घटना स्पष्ट केली.

माझ्या पत्नीने एफआयआर फाईल केला आहे की, तिच्यावर दबाव आणून माझ्यामाध्यमातून (फडणवीसांच्या माध्यमातून) काम करून घेण्याचा प्रयत्न झाला. आधी पैसे ऑफर केले, मग ब्लॅकमेल करण्यात आलं. अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती सात आठ वर्षे फरार आहे. या व्यक्तीवर १४-१५ गुन्हे आहेत. त्याची अनिक्षा नावाची मुलगी शिकली सवरली आहे. हुशार आहे. २०१५-१६ दरम्यान ती अमृताला भेटत होती. परंतु नंतर भेटणं बंद झालं. पुन्हा २०२१ साली अमृताला भेटणं सुरू केलं. मी डियाझरन आहे. मी डियाझनर कपडे तयार करते. आर्टिफिशिअल दागिने तयार करते, असं सांगून तिने विश्वास संपादन केला. बेस्ट पॉवरफुल ५० वुमेनमध्ये माझं नाव आलं आहे. आईवर लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशनही तिने अमृताकडून करून घेतलं. विश्वास संपादन केला. घरी येणं-जाणं चालू केलं. डियाजनर कपडे घेऊन येत असत. विश्वास संपादन केल्यानंतर तिने तिच्या वडिलांना चुकीच्या केसमध्ये अडकवलं असल्याची माहिती तिने दिली. माझ्या पत्नीने तिला निवेदन देण्यास सांगितले. चुकीच्या पद्धतीने अडकवलं असेल तर बाहेर काढता येईल, पण गुन्हे खरे असतील तर काही करता येणार नाही, असंही तिने बजावलं, असं फडणवीस सभागृहात सांगत होते.

“सरकार बदलल्यावर तिने हे सगळं सांगितलं. सरकार बदलेपर्यंत ती फक्त विश्वास संपादन करत राहिली. माझे वडील सगळ्या बुकीजना ओळखतात. मागच्या काळात आम्ही बुकीजची इन्फोर्मेशन द्यायचो, त्यानुसार रेड व्हायची आणि दोन्हींकडून पैसे मिळायचे. तसंच, आपणही करू, असं तिने सांगितलं. एकतर इथून पैसे जमवूया किंवा मी तुम्हाला १ कोटी देते माझ्या वडिलांना सोडवा, अशी तिने मागणी केली. परंतु, ती सतत बुकीजचा विषय करत होती. वारंवार बुकीजचा विषय आल्यानंतर अमृताने तिला फोनवर ब्लॉक केलं. त्यामुळे एका अनोळखी नंबरवरून तिने ऑडियो आणि व्हिडीओ पाठवले. एखाद्या व्हिडीओमध्ये ती हार घालतेय, अंगठी घालतेय, असं दिसत होतं. या सर्व व्हिडीओमध्ये अत्यंत गंभीर व्हिडीओ होता. ही मुलगी बाहेर कुठेतरी एका बॅगेत पैसे भरतेय असं दिसत होतं. तर दुसऱ्या व्हिडीओतील तशीच बॅग आमच्याकडे काम करणाऱ्या बाईला देतेय. मग, संबंधित व्यक्तीने धमक्या पाठवल्या की हे व्हिडीओ टाकले तर नवऱ्याची नोकरी जाईल. माझे सगळ्या पक्षाशी संबंध आहेत. त्यामुळे आमचे सगळे केसेस परत घ्या, अशा धमक्या आल्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावून, त्यांना सगळं सांगितलं. याबाबत एफआयआर पब्लिक नाही केला. याप्रकरणी फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये बॅग, भरलेली बॅग आणि दिलेली बॅग फ्रेम बाय फ्रेम केली आहे. संबंधित महिला तिच्या वडिलांबद्दल बोलत होती त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचणार होतो. त्यानुसार पोलिस कार्यवाही करत होते. यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. या महिलेने अनेक पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावे घेतली होती,” असं फडणवीस म्हणाले.

“एका संवादात मागच्या सीपींच्या काळात आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई सुरू झाली होती, पण सरकार बदलल्यावर थांबली, असा दावाही त्या महिलेने केला होता, असं फडणवीस म्हणाले. यातील बऱ्याच गोष्टी रेकॉर्डेड आहेत. त्यामुळे तो ट्रॅपमध्ये येणार होता. परंतु, एफआयआरची प्रत एका वृत्तपत्राच्या हाती लागल्याने ती बातमी प्रसिद्ध झाली. संबंधित महिला सापडेल की नाही माहित नाही. पण, तो माणूस पाच सात वर्षे पळालेला आहे. दोन ते तीन दिवसांत तो हातात आला असता. परंतु आता त्याला हिंट मिळाली असेल,” असं फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “माझा कोणावर आरोप नाही. ज्याप्रकारचे तिने हिंट दिल्या, त्यानुसार मी वारंवार सांगत होतो की पूर्वीही मला अडचणीत आणायचा प्रयत्न केला गेला. पण मी सापडलो नाही. मला हिंट होती की माझ्या कुटुंबावरही काहीतरी चाललं आहे. मला लोक सांगत होते की तुमच्या कुटुंबालाही ट्रॅप करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो व्यक्ती हातात आला असता तर त्यापाठीमागे कोण आहे हे कळलं असतं, असा खुलासा त्यांनी केला.

 

First Published on: March 16, 2023 12:38 PM
Exit mobile version