मुख्यमंत्री, शरद पवारांनंतर देवेंद्र फडणवीस देखील कोकण दौऱ्यावर

मुख्यमंत्री, शरद पवारांनंतर देवेंद्र फडणवीस देखील कोकण दौऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन दिवस कोकणचा दौरा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे दिनांक ११ जून आणि १२ जून असे दोन दिवस वादळग्रस्त कोकणाच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन निसर्ग वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.

दिनांक ११ जून रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी ते भेटी देणार आहेत. तर दिनांक १२ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करणार असून तेथील स्थानिकांशी संवाद देखील साधणार आहेत.

शरद पवारांनी देखील केला कोकण दौरा

‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील दोन दिवस कोकण दौरा केला. ते ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकर्‍यांची देखील भेट घेतली.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आणि विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे व स्थानिक आमदार उपस्थित होते. १० जून रोजी त्यांनी रत्नागिरी जिल्हा दौरा केला असून सुरुवातीला दापोली येथील नुकसानीची पाहणी देखील केली.


राज्यपालांचे ज्ञान ऑक्सफोर्डपेक्षा भारी; शरद पवारांचा कोश्यारींना टोला
First Published on: June 10, 2020 7:27 PM
Exit mobile version