विजयी होताच धंगेकर पोहोचले केसरी वाड्यात; म्हणाले, मुक्ताताईंच्या स्वप्नातील कसबा…

विजयी होताच धंगेकर पोहोचले केसरी वाड्यात; म्हणाले, मुक्ताताईंच्या स्वप्नातील कसबा…

Kasba By Poll Elections Result | पुणे – कसबा विधानसा मतदारसंघात काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. भाजपाचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या या भागातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) जिंकून आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथे भाजपाची सत्ता होती. गिरीश बापटांनी ही जागा जिंकून आणल्यानंतर प्रत्येक टर्मला भाजपाचाच उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाला. मात्र, यंदाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ करत काँग्रेसने बाजी मारली. दरम्यान, विजयाची पताका गळ्यात पडताच रवींद्र धंगेकर यांनी थेट टिळक वाडा आणि मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांशी भेट घेतली.

हेही वाचा नेहमी विजयी होणाऱ्यांच्या पराभवाची चर्चा अधिक, कसबा पराभवाचे आत्मचिंतन करणार – फडणवीस

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. यासाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांसमोर उभी ठाकली होती. भाजपाचे हेमंत रासने आणि काँग्रसेचे रवींद्र धंगेकर यांच्यात कडवी लढत झाली. अखेर, रवींद्र धंगेकर यांनी भाजपाला बालेकिल्ला फोडला आणि काँग्रेसची जागा मिळवून दिली.

रवींद्र धंगेकर यांना अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर त्यांनी मुक्ता टिळक यांच्या केसरी वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी केसरी वाडा गणपतीचं दर्शन घेतलं. तसंच, शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांचीही भेट घेतली.

भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “निश्चितच मुक्ताताईंनी प्रस्तावित केलेली व त्यांच्या स्वप्नातील कसबा घडविण्यासाठी जी जी कामे आवश्यक आहे ती कामे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कसबा मतदारसंघ हा कुठल्याही पक्षीय राजकारणामुळे विभागलेला नाही. तर विकासाच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र घेत कसबाच्या विकासाची वाटचाल सुकर करण्याचा प्रयत्न या पुढील काळात माझा राहील.”

हेही वाचा – ‘…आता नंबर बापटांचा…’ पासून ‘धंगेकर इज नाऊ MLA’, पुण्यातील बॅनरबाजीने गाजली कसबा पोटनिवडणूक

First Published on: March 3, 2023 9:23 AM
Exit mobile version