घरमहाराष्ट्रनेहमी विजयी होणाऱ्यांच्या पराभवाची चर्चा अधिक, कसबा पराभवाचे आत्मचिंतन करणार - फडणवीस

नेहमी विजयी होणाऱ्यांच्या पराभवाची चर्चा अधिक, कसबा पराभवाचे आत्मचिंतन करणार – फडणवीस

Subscribe

कसबा पोटनिवडणुकीतील विजय हा रवींद्र धंगेकरांचा विजय आहे. महाविकास आघाडीचा हा विजय नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजप या पराभवाचे आत्मचिंतन करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Kasba Peth By-Poll Election Result 2023 मुंबई – कसबा पोटनिवडणुकीतील विजय हा रवींद्र धंगेकरांचा विजय आहे. महाविकास आघाडीचा हा विजय नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कसब्यातील विजयाचं आम्ही आत्मचिंतन करु असंही फडणवीस म्हणाले.

भाजपची वापरा आणि फेकून द्या ही नीती राहिली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली त्यावर फडणवीसांनी त्यांना टोला लगावला आहे. दुसऱ्याच्या घरी मुलगा जन्माला यातच त्यांना आनंद आहे. दुसऱ्याच्या मुलाचे पेढे किती दिवस वाटत राहाणार आहात, असा खोचक टोला ठाकरेंना लगावला. शिवसेनेला या पोटनिवडणुकीत एकही जागा देण्यात आली नाही, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेवर (ठाकरे गट) केली.

- Advertisement -

फडणवीस म्हणाले, आज सर्वाधिक आत्मचिंतन करण्याची गरज उद्धव ठाकरेंना आहे. त्यांच्या नाकाखालून ४०-४० लोक निघून गेले तरीही ते बोध घ्यायला तयार नाही. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला याच्यातच ते आनंद मानत आहेत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

मतांची टक्केवारी वाढली – फडणवीस
राज्यातील दोन्ही पोटनिवडणुकीत आमचा विजय होईल असा विश्वास होता. मात्र कसब्यात आमचा पराभव झाला. मात्र कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. २००९ आणि २०१९ पेक्षा २०२३ मध्ये मतांची टक्केवारी जास्त आहे. ४५ टक्क्यांनी मते वाढली आहेत, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

कसब्यात राहुल गांधींचा फोटोही वापरला नाही
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कसब्यातील विजयाचे सर्व श्रेय हे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना दिले. ते म्हणाले, आम्ही केलेल्या सर्व्हेमध्येही धंगेकरांचे पारडे जड होते. त्यांच्याबाजूने एक सहानभुतीची लाट सुरुवातीपासून होती, ती शेवटपर्यंत कायम राहिली.
आम्हाला वाटलं होतं की ही लाट निवडणुकीच्या शेवटापर्यंत कमी होईल, मात्र तसं झालं नाही. हा पूर्णपणे धंगेकरांचा विजय आहे. त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा साधा फोटोही प्रचारात कुठे वापरला नाही. जनतेची त्यांना साथ मिळाली, असं फडणवीस म्हणाले.
भाजपच्या पराभवाचे पक्ष आत्मचिंतन करणार असल्याचंही ते म्हणाले. आम्ही सातत्यानं विजयी होत असतो त्यामुळे आमच्या पराभवाची चर्चा अधिक होते, असंही फडणवीस म्हणाले.

…मग चिंचवडमधील पराभव कोणाचा?
कसब्यात भाजपचा झालेला पराभव हा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा पराभव असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, मग चिंचवडमधील पराभव कोणाचा आहे. शरद पवार आणि अजित पवार हे स्वतः चिंचवडमध्ये प्रचारासाठी फिरले. तिथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला, हा पराभव कोणाचा आहे, असा सवाल फडणवीसांनी केला.

चिंचवडमधील विजय लक्ष्मण जगतापांना समर्पित
Chinchwad By-Poll Election Result 2023 चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या विजयी झाल्या आहेत. त्यांचा विजय हा जनतेने लक्ष्मण जगतापांना वाहिलेली श्रद्धांजली असल्याचं फडणवीस म्हणाले. विरोधीपक्ष चिंचवडमधील विजयाचे श्रेय हे भाजपला देण्याऐवजी राहुल कलाटेंमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला असं विश्लेषण करत आहेत, हे चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले.
राहुल कलाटे यांच्यामुळे भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या असा अपप्रचार केला जात आहे.
राहुल कलाटे हे निवडणुकीच्या रिंगणात नसते तर त्यांची ६० टक्के मतं ही भाजपला मिळाली असती. यासाठी एका स्ट्रॅटिजीने त्यांना उभं करण्यात आलं. २०१९ मध्येही त्यांना उभं करण्यात आलं होतं. हिंदू मतांच्या विभागणीसाठी कलाटेंना उभं केलं जातं, असा आरोप फडणवीसांनी केला. मात्र यानंतरही इथं भाजपचा विजय झाला आहे, असं फडणवीसांनी म्हटलं.

आज पूर्वोत्तर भागातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांच्या विधानसभेचेही निकाल जाहीर झाले. या तीन राज्यांपैकी त्रिपुरी, नागालँडमध्ये भाजपचा विजय झाला आहे. येथे मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे फडणवीसांनी अभिनंदन केले. या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले. ही २०२४ च्या विजयाची नांदी असल्याचं फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाचा काळ आता जवळ आला; त्रिपुरा, नागालँड विजयानंतर मोदींचे वक्तव्य 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -