जनमताच्या आधारावर जिंकण्याची तयारी ठेवा- वळसे पाटील

जनमताच्या आधारावर जिंकण्याची तयारी ठेवा- वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

‘विरोधी पक्षांकडून मोठी आर्थिक ताकद वापरली जाण्याची शक्यता आहे. परंतु आपण जनमताच्या आधारावर निवडणूक जिंकण्यासाठी तयार रहा’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ईशान्य मुंबई विभागाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. ‘या सरकारच्या काळात लोकशाही मोडीत काढली जात आहे. लोकशाही राहणार की जाणार? अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर सार्वत्रिक निवडणूक होईल की नाही? याबाबत लोकांच्या मनात शंका आहे’, असेही पाटील यावेळी म्हणाले.

‘एकजुटीने काम करावे लागेल’

‘आज देशात २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. आज शरद पवारसाहेब सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणत आहे. त्यामुळे आपण या जातीयवादी ताकदीचा पराभव करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करावं लागेल’, असे आवाहनही दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. ‘आपण एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वासही दिलीप वळसे पाटील यांनी शेवटी व्यक्त केला.


वाचा पवार असं का म्हणाले – तर या सरकारला थोबाडही दाखवता येणार नाही

महाआघाडी एकत्र नांदेल?

एकीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा, बार्गेनिंग आणि त्यातून उद्भवणाऱ्या वादामध्ये अडकले असतानाच दुसरीकडे महाआघाडीने धुमशान प्रचाराचा श्रीगणेशा बुधवारी नांदेडमध्ये झालेल्या सभेतून केला. मात्र, दोन पक्ष असलेल्या सेना-भाजपमध्ये इतका वाद असताना महाआघाडीतले इतके सारे पक्ष एकत्र कसे नांदतील? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

First Published on: February 21, 2019 5:23 PM
Exit mobile version