गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दरबारात धक्काबुक्की; भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दरबारात धक्काबुक्की; भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दरबारात धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर यते आहे. मुखदर्शनाच्या रांगेत भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळासाठी राजाच्या दरबारात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद शांत केला. (dispute at lalbaugcha raja pandal argument between devotees and security guards)

नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून गणेशभक्त मोठ्या प्रमाणात लालबाग परिसरात गर्दी करतात. दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दोन रांगा केल्या जातात. एक नवसाची रांग आणि लाबून दर्शनाची रांग, अशा दोन रांगा केल्या जातात. या रांगेत लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविक तासंतास उभे असतात.

या रांगेत उभे असताना भावकांची बाचाबाची, राडा, अरेरावी, धक्काबुक्की, दमदाटी असे प्रकार नेहमी घडत असतात. मात्र, यंदाही लालबागच्या राज्याच्या दरबारात घडल्याचंही पाहायला मिळाले. मुखदर्शनाच्या रांगेतून जाताना वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

यंदा तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशातच लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. लालबाग राजाच्या दर्शानासठी दोन वर्षांनंतर अलोट गर्दी बघायला मिळत आहे. तसेच, मुंबई पोलीस, पालिका कर्मचारी आणि मंडळाच्या सदस्यांकडून गर्दीचं नियोजन केलं जात आहे.

यंदा लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळानं राममंदिराचा देखावा उभारला आहे. लालबागचा गणेशोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते.


हेही वाचा – कदाचित ‘त्या’ इमारतीवरही ‘ट्विन टॉवर’सारखीच कारवाई, मुंबई हायकोर्टाने बिल्डरला सुनावले

First Published on: August 31, 2022 5:02 PM
Exit mobile version