विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला व्हिप लागत नाही, शिवसेनेच्या आदेशावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला व्हिप लागत नाही, शिवसेनेच्या आदेशावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

BJP leader Sudhir Mungantiwar said that this is not a Political Crisis this is support to Narendra Modi

विधानसभा अध्यक्षपदासाठी आज विशेष अधिवेशनात निवडणूक होणार आहे. शिवसेना (Shivsena) आणि भाजपने (BJP) यासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, शिवेसनेच्या नेत्यांनी शिवसेना उमेदवाराला मतदान करावे असा व्हिप शिवसेनेने जारी केला आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आता बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी व्हिप लागत नाही, अशी माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आज ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. (Does not require a whip for the post of Assembly Speaker, Mungantiwar’s reply to Shiv Sena’s order)

हेही वाचा – शिंदे सरकारची अग्निपरीक्षा; विधानसभा अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

अध्यक्षपदासाठी व्हिप लागत नाही. अध्यक्षपदाची निवडणूक सद्सद्विवेकबुद्धीने करण्याची संविधानात तरतूद अपेक्षित आहे. महाराष्ट्र विधानसभा ३२० नियमांपैकी अध्यक्षांची निवडणूक सद्सद्विविकेबुद्धीने केली जाते. पक्ष, रंग, वय, उंची हा कुठेही भाग येत नाही. या तरतुदीत राहूनच निवडणूक होत असते, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. शिवसेनेने आपल्या आमदारांना दिलेल्या व्हिप आदेशावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

…लोकशाहीवरचा हल्ला

विधानसभेचं अध्यक्षपद रिकामे ठेवणं म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला आहे, असंही ते पुढे म्हणाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची महाविकास आघाडी सरकारला काहीच देणंघेणं नव्हतं. देशहितापेक्षाही त्यांना वंशवाद, परिवारवाद हे महत्त्वाचं आहे, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.

हेही वाचा – शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका

सेनेला हिंदुत्त्व समजलं नाही

शिवसेनेच्या ओठात हिंदूत्त्व असलं तरीही त्यांच्या मनात सोनियाजी होत्या असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मुनगंटीवार म्हणाले शिवसेनेला हिंदुत्व समजलंच नाही. त्यांनी हाती भगवा घेतला, पण त्यांना भगव्याचा अर्थच समजला नाही.

 

First Published on: July 3, 2022 9:58 AM
Exit mobile version