viral video:पुण्यात मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात योगा

viral video:पुण्यात मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात योगा

Viral Video:पुण्यात मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात योगा

 

मद्यधुंद अवस्थेत एका उच्चशिक्षित तरुणीने पुण्यातील स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या हिराबाग चौकात धिंगाणा घातला असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीचा स्वत:वरील ताबा सुटल्याने तिने थेट रस्त्यावरच लोटांगण घालण्यास सरुवात केली. याचदरम्यान रस्त्यातून जाणाऱ्या अनेक गाड्यांना ती अडवण्याचा प्रयत्त करत होती. घटनेचं गांभिर्य लक्षात घेत स्थानिक नागरिकांने ताबडतोब पोलिसांना संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबधित तरुणीला ताब्यात घेतले तसेच तरुणीची समजूत कढण्यात आली. रात्री साडेदहाच्या सुमारास ही तरुणी दारु पिऊन रस्त्यावर झोपून गेली तसेच आरडाओरडा करत गोंधळ घालत होती. यामुळे तरुणीची अवस्था पाहता लोकांची तुफान गर्दी रस्त्याच्या चारही बाजूला जमली होती. तसेच ही मुलगी सुशिक्षित असल्याचे पोलिसांना कळाले पण ती अशाप्रकारे वागणूक का करत आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. फक्त दारुच्या नशेत तिने हा वचित्र प्रकार केला होता की यामागे आणखी इतर काही कारण होते का असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे. पण तरुणीचा सावळा गोंधळ पाहता या तरुणीला वेड तर लागले नाही ना अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली.

 

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.  व्हिडिओत मद्यधुंद अवस्थेत तरुणी भर रस्त्यात धिंगाणा घालत आहे. नुसता धिंगाणाच घातला नाही तर रस्त्यावर वाहतूक सुरू असताना लोटांगण आणि योगाही करत आहे.सध्या तरुणी खडक पोलिस स्थानकात घेऊन जाण्यात आले. पोलिसांनी तिची सखोल चौकशी करण्यात येत आहे.


हे हि वाचा – MPSC Exam : अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार, लोकसेवा आयोगाचा निर्णय

First Published on: August 4, 2021 12:00 PM
Exit mobile version