कर्नाटकात अतिवृष्टी; पुरामुळे 27 जिल्हे आणि 187 गावे बाधित

कर्नाटकात अतिवृष्टी; पुरामुळे 27 जिल्हे आणि 187 गावे बाधित

देशभरातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे 27 जिल्हे आणि 187 गावे बाधित झाली आहेत. पूरस्थितीमुळे कर्नाटकातील रस्ते जलमय झाले असून, वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाले आहे. तसेच, राजधानी बंगळुरुमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. (due to floods in karnataka state 27 districts affected)

कर्नाटकात पावसाची संततधार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असल्यामुळे अनेक भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे. त्याशिवाय, पावसाच्या घटनांमुळे राज्यात एकूण 23 हजार 794 घरांचे नुकसान झाले आहे. तर शेती पिकांचे देखील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

पावसामुळे आत्तापर्यंत 5.8 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळते. या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्याची माहिती मंत्री अशोक यांनी दिली आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे मंत्री अशोक म्हणाले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रामनगरासह पूरस्थितीमुळए बाधित झालेल्या परिसराला भेट दिली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच लोकांना मदतीचे आश्वासन दिले आहे.


हेही वाचा – UN मध्ये भारताला फ्रान्सचा पाठिंबा; पॅरिसमध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही देशांकडून महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती

First Published on: August 31, 2022 4:16 PM
Exit mobile version