घरदेश-विदेशUN मध्ये भारताला फ्रान्सचा पाठिंबा; पॅरिसमध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही देशांकडून महत्त्वाच्या मुद्यांवर...

UN मध्ये भारताला फ्रान्सचा पाठिंबा; पॅरिसमध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही देशांकडून महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती

Subscribe

नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्स यांनी ३० ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) आणि इतर बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी लक्षात घेऊन, दोन्ही बाजूंनी UNSC च्या अजेंडावरील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर मते मांडली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व यूएनमधील राजकीय व्यवहार विभागाचे सहसचिव प्रकाश गुप्ता यांनी केले. पॅरिसमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचाही या संघात समावेश होता. त्याच वेळी फॅबियन पिनोन आणि इतर वरिष्ठ अधिकारी फ्रेंच बाजूच्या शिष्टमंडळात सामील होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली.

दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या या बैठकीत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीवरील विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेशी संबंधित विशिष्ट मुद्द्यांवर मते मांडण्यात आली. यादरम्यान, दोन्ही देशांमधील चालू असलेली भागीदारी विविध मंचांवर दृढपणे सुरू ठेवण्यावर सहमती झाली. यामध्ये दहशतवादाचा मुद्दाही समाविष्ट करण्यात आला होता.

- Advertisement -

भारत-फ्रान्सच्या प्रतिनिधींमधील या संभाषणात दोन्ही बाजूंनी आपापले प्राधान्यक्रम ठेवले. याशिवाय सप्टेंबर आणि डिसेंबर 2022 मध्येफ्रान्स आणि भारताने UNSC च्या आगामी अध्यक्षपदावर चर्चा केली. याशिवाय सप्टेंबर 2022 मध्ये होणार्‍या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77 व्या अधिवेशनावरही चर्चा झाली. यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात फोनवर चर्चा झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण सहकार्य, प्रकल्प आणि अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा झाल्याचे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले होते. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फोन संभाषणादरम्यान जागतिक अन्न सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या आव्हानांवरही चर्चा झाली.


परीक्षेत कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारले, झारखंडमधील घटनेने खळबळ


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -